कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??
In reply to हावो, मला पण सांगा. by अभ्या..
In reply to गावात सीएनजी पंप नसता by जेम्स वांड
In reply to अपना डबल पासिंग है अभि. by अभ्या..
In reply to आठवड्यातून एकदाच दोनदाच by टवाळ कार्टा
मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होतेत्रिकोण बराच मोठा आहे. म्हणून डिझेल चांगली.
In reply to आठवड्यातून एकदाच दोनदाच by टवाळ कार्टा
In reply to वॅगनार विसरलात का? by राजेंद्र मेहेंदळे
In reply to जास्त ड्रायव्हिंग नसेल तर by प्रसाद गोडबोले
In reply to जास्त ड्रायव्हिंग नसेल तर by प्रसाद गोडबोले
In reply to हे आपले तर्कशास्त्र आर्थिक by सुबोध खरे
लग्नाला २५ वर्षे झाली आहेत त्यामुळे बायकोकडे दुर्लक्ष कसे करायचे तेही मी चांगला शिकलो आहे.
थोडं सविस्तर सांगितलत तर बर्याच जणांना उपयोग होईल...In reply to हे आपले तर्कशास्त्र आर्थिक by सुबोध खरे
मी तिला सांगतो "मी पण" जुना झालो आहे.अगदी पटलं. तुमच्या सौ. फक्त विनंती (तुमच्या शब्दात भुणभुण) करतात आणि प्रत्यक्ष निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता, याचा अर्थ तुमचा काळ लै जुनाच झाला की.. ;-)
In reply to मी तिला सांगतो "मी पण" जुना by गवि
In reply to मी बायकोला सान्गतो तू गाडी by सुबोध खरे
In reply to कारला ११ वर्षे झालीत म्हणजे by अभिजीत अवलिया
गर्दीने रस्ते ओसंडून वाहणाऱ्या बेशिस्त पुण्यात रोज गाडी चालवून माझा स्वभाव चिडचिडा होऊ लागला आहे असे वाटतेय.संपुर्ण अनुमोदन ! स्वतःची गाडी असली की मनस्ताप होतो हेच जर बस मध्ये असलो किंव्वा ऑफीसच्या कॅब मध्ये असलो तर बसखाली येवुन कोणी मेलं तरी आपल्याला फरक पडणार नाही ! कॅबमध्ये देखील आपण अलिप्त राहु शकतो ! अॅक्सीडेन्ट झालच तरी आप्ल्यावर रिस्क नाही ! अलिप्तपण महत्वाचे . बस मध्ये बसलो कि निवांत डोळे मिटुन घ्यावेत . मग आता टृअॅफिक लागो , की अॅक्सीडेन्ट होवो कि पोलिसाने थांबवो , किंव्वा गाडीला स्कॅच पडो किंव्वा कोणी ठोको , काय वाट्तेल ते होववो, आपल्याला घेणेदेणे नाही ! कानात इयरफोन लाऊन बारावा अध्याय ऐकायला सुरुवात करावी ... एर्हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां । रथु काई खटपटा । करितु असे ? ॥ १२२ ॥
In reply to गर्दीने रस्ते ओसंडून by प्रसाद गोडबोले
In reply to कारला ११ वर्षे झालीत म्हणजे by अभिजीत अवलिया
गाडी वापरण्यापेक्षा स्क्रॅप करणे योग्य होईल.गाडी कबाड म्हणून विकताना खूप खबरदारी घ्यावी लागते नाहीतर स्क्रॅप म्हणून विकलेली गाडी कुठे यूपी बिहारात पाठवून वापरायला घेतली आणि तिकडे काही लोच्या झाला तर मूळ मालक गोत्यात येतो. विकण्यापूर्वी ईंजिन आणि आणखी एक जागी वेल्ड केलेली नंबराची पट्टी काढवून घेऊन ती आरटीओत जमा करणे वगैरे प्रकार असतात असे ऐकले आहे. कृपया याविषयी तज्ञ मंडळींनी मार्गदर्शन करावे.
In reply to हे आपले तर्कशास्त्र आर्थिक by सुबोध खरे
In reply to "मी तिला सांगतो "मी पण" जुना by टवाळ कार्टा
In reply to ट का शेट by सुबोध खरे
In reply to जास्त ड्रायव्हिंग नसेल तर by प्रसाद गोडबोले
In reply to जास्त ड्रायव्हिंग नसेल तर by प्रसाद गोडबोले
In reply to जास्त ड्रायव्हिंग नसेल तर by प्रसाद गोडबोले
In reply to कार हि एक सोयीची गोष्ट by सुबोध खरे
तेंव्हा बाहेर घेऊन जायची सोय आहे हे पण कारण आता रद्दबातल ठरते. स्वतःची कार हवी आणि चालवायची हौस आहे एवढे कारण कार विकत घेण्यासाठी पुरे. बाकी सर्व कारणे उपयोगी नाहीत.
म्हणूनच माझ्या प्रतिसादात पहिल्यांदाच स्पष्ट केलं होतं कि कार गरज म्हणून घेत आहात कि हौस ते ठरवा. परंतु बाकीची कारणे उपयोगी नाहीतच असे म्हणता येत नाही.
बाकी झुमकार वगैरे सगळं ठीक आहे पण ते प्रत्येकासाठी सोयीचे आहे असे वाटत नाही,वाटल्यास त्यांच्या अटी सविस्तर वाचून पाहा.
तुम्ही २५ वर्षातून एकदा ४ दिवसांसाठी ३२० किमी कार वापरणार असाल तर खचितच तुम्ही नवीन कार घेणे योग्य नाही.
पण मग आमच्यासारख्या वर्षाला चाळीसेक हजार रनिंग करणाऱ्यांनी काय करायचं ?In reply to कार हि एक सोयीची गोष्ट by सुबोध खरे
In reply to छान चर्चा by डोके.डी.डी.
In reply to छान चर्चा by डोके.डी.डी.
In reply to हा ना राव, मारक्याचे आणि by अभ्या..
In reply to हा ना राव, मारक्याचे आणि by अभ्या..
हा ना राव, मारक्याचे आणि सुबोध सरांचे प्रतिसाद वाचून माझीही चलबिचल होतेय. गाडी नकोच असा माईंडसेट बनत आहे.ख्या खया ख्या ! अभ्याशेठ , तुम्ही डॉक्टरांचे आणि गणामास्तरांचे ऐका , हौस म्हणुन गाडी घेत असाल तर जरुर घ्या कारण डॉक्टर म्हणाले तसे हौसेला मोल नाही . गाडी च्या निमित्तामुळे आनंद होत नाही असे नाही , फक्त माझ्या लेखी त्यासाठी घ्यावा लागणारा उपद्व्याप वर्थ नाहीये इतकेच ! तुम्ही गाडी घ्या , आम्ही आनंदाने तुमच्या आनंदात सहभागी होवु ! माझे मत अत्यंत वैयक्तिक आहे, मी गाडी नको म्हणतोय कारण मला आता कोणतेच सव्यापसव्य, नसत्या कटकटी नको वाटतात . दुष्काळ संपल्यावर , सुगीचे दिवस आल्यावर तुकोबांनी आपल्या वाटणीची कर्जाची कागदपत्रे , अर्धी खते इंद्रायणीत का बुडवली हे मी आता "समजु" शकतो ! आधीही कळत होते , आता वळायलाही लागले आहे इतकेच ! :)
In reply to छान चर्चा by डोके.डी.डी.
In reply to * योग्य चॉइस केल्यास वरील by सुबोध खरे
In reply to हिशोब तर करणाच पडेगा, by अभ्या..
In reply to हिशोब तर करणाच पडेगा, by अभ्या..
In reply to * योग्य चॉइस केल्यास वरील by सुबोध खरे
घरचं जेवण काय याची किंमत मला नक्कीच चांगली समजली आहे.कार ठेवण्यातले / चालवणयातले व्याप जसे ध्यानी घेतले तसेच घरी जेवण बनवण्यातले व्याप (जे जनरली पुरुषांना पडत नाहीत ते) ध्यानात घेतलेले दिसत नाहीत असं निरीक्षण नोंदवतो. शिवाय
भाड्याच्या घरात आपल्या सोयीचे फर्निचर सजावट काहीही करता येत नाहीतत्समच पॅरेलली, ओला उबरमधेही / भाड़ाटैक्सीमधेही हवे ते खाणेपिणे, ते सांडेल याची भीती न बाळगणे, हव्या त्या एक्सेसरीज/ फ्रेशनर / हैंगिंग्स इ. लावणे, ठणाणा ओरडत अंताक्षरी खेळत जाणे, हवं तिथे हवा तेवढा ब्रेक मारून थांबणे, खाजगी घरगुती चर्चा करत जाणे वगैरे खूप काही करण्यावर मर्यादा पडतात. ओला उबर जनरली पॉइंट टू पॉइंट असतात. तीनचार ठिकाणी एका फेरीत आणि प्रत्येक ठिकाणी अनिश्चित काळ वाट बघून (उदा. आधी बँक, तिथे काम झालं की वेगळीकडे कपड़ेखरेदी, तिथे ऐनवेळी आल्टर करुन द्यायला एका तासाने परत या असं महटल्यावर तिथेच रेस्टोरेंटमधे तासभर नाश्ता, असे प्लान्स ओला उबर वेटिंगमधे ठेवून किंवा दर सेगमेण्टला नवी बुक करुन पार पाडणं अवघड असतं. आणि घरगुती कामाची मोहीम 99% वेळा अशाच प्रकारची असते. शिवाय भाडयाच्या सेल्फ ड्राईव्ह कारसाठी बरंच सिक्युरिटी डिपोझिट आणि अपघात डैमेज झाल्यास ठराविक इन्शुर्ड रकमेच्या वरचा सगळा भुरदंड वापरणाऱ्याला बसतो. याचा फायदा घेऊन असे सेवादाते अनेकदा नॉर्मल वेअर टेअरचे ख़र्चही आपल्याकडून काढतात. ही दुसरी बाजू फक्त दाखवतोय.
In reply to घरचं जेवण काय याची किंमत मला by गवि
शिवाय भाडयाच्या सेल्फ ड्राईव्ह कारसाठी बरंच सिक्युरिटी डिपोझिट आणि अपघात डैमेज झाल्यास ठराविक इन्शुर्ड रकमेच्या वरचा सगळा भुरदंड वापरणाऱ्याला बसतो. याचा फायदा घेऊन असे सेवादाते अनेकदा नॉर्मल वेअर टेअरचे ख़र्चही आपल्याकडून काढतात.वर लिहिलेले आहे पण इथे विषय निघाला आहे म्हणुन परत लिहितो आहे. वर्षभर मी झूम कारचा व्यवस्थित वापर करत होतो पण सध्या त्यांनी सगळी सिस्टीम ऑटोमेटेड केली आहे. कार द्यायला वा घ्यायला कुणी अटेंडंट नसतो आणि ह्याचा फटका मला बसलाय. कार सरेंडर केल्यानंतर दोन दिवसांनी रात्री १२ वाजता मेसेज आला कि तुमची १०हजाराचे बिल अजुन भरणे बाकी आहे. झोप उडाली. कस्टमर केअर शी बोललो तर कळले फ्रंट व रिअर बंपर डॅमेज चार्जेस लावले गेले आहेत. सध्या दर एक दिवसाआड फोनाफोनी चालु असते. विकतचे दुखणे गळ्यात पडले आहे. बरे स्वतःची कार असुन सुध्दा केवळ वेगवेगळ्या कार्स चालवायला मिळाव्यात म्हणुन मी झूमकारचा वापर करत होतो पण सध्या तर घी देघा लेकिन बडगा नही ह्या उक्तीचा अनुभव घेत आहे.
In reply to शिवाय भाडयाच्या सेल्फ by कानडाऊ योगेशु

हावो, मला पण सांगा.