बाजार – बजारना याळ
- डॉ. सुधीर रा. देवरे
ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतो. मात्र प्रत्येक गावात बाजार भरत नाही. आजूबाजूच्या दहा पंधरा खेड्यांच्या मध्यभागी असलेल्या थोड्या मोठ्या खेड्यात बाजार भरत असतो. आजूबाजूच्या गावांचे हे बाजार भरणारं गाव केंद्रच समजलं जातं.
बाजाराभोवती देण्याघेण्याचे अनेक व्यवहार होत आले आहेत. विशिष्ट बाजाराच्या गटातल्या गावांत मजूर लोकांची मजूरी प्रत्येक आठ दिवसांनी बाजाराच्या दिवशी चुकती करायची असते. बाजाराच्या दिवशी शेतमजूर दुपारपर्यंत एक पारग शेतात काम करतात. बाजारासाठी दुपारून सुट्टी घेतात.
मिसळपाव