लेखकफोटोग्राफर243यांनी गुरुवार, 20/09/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार २०१९ च्या विश्व चषक स्पर्धे साठी लंडन आणी लीड्स ला जायचा प्लॅन आहे , हातात ५ जुलै ते १५ जुलै पर्यंत वेळ आहे, काय काय पाहता येईल, ट्रीप कशी प्लॅन करावी, बरोबर ऑफिस चे मित्र आहेत
लेखकज्योति अळवणीयांनी गुरुवार, 20/09/2018 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आशाताई आणि आपलं भावगीत विश्व
आशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या! 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते....
'जिवलगा......
लेखकविकास...यांनी बुधवार, 19/09/2018 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
फलटण लोणंद पुणे मुंबई जयपूर अजमेर पुष्कर उदयपूर चित्तोडगड
तयारी: जुलै २०१८ मध्ये विमानाचे तिकीट मिळाले आणि सुरुवात चांगली झाली
बऱ्याच प्रकारे प्रयत्न करून रुपये ५५०७/- मध्ये ३ तिकिटं मिळाली. मी, सौ. आणि चिंरजीव. मुंबई ते जयपूर रुपये १८३५ प्रत्येकी.
विमान Jet Airways चे Boeing होते. पण ते Mumbai International Airport T२ वरून असल्याने जरा काळजी होती.
लेखकअनन्त्_यात्रीयांनी मंगळवार, 18/09/2018 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी चालून आलो अशाच वाटा
ज्या माझ्या नकळत
मुक्कामी पोचवून निरोप घेण्याआधी
पुढील प्रवासाच्या धुंदीतच
हरखून गेल्या
मी मोजून आलो अशाच लाटा
ज्या माझ्या नकळत
किनाऱ्यावरी फेनिल होऊन फुटण्याआधी
सागर तळीची अपार शांती
पिऊन आल्या
मी शोधून आलो अशाच ओळी
ज्या माझ्या नकळत
विस्मरणाच्या वादळात पडझडण्याआधी
शब्दभूल पाडीत कुणाच्या
ओठी रुळल्या
लेखकट्रम्पयांनी मंगळवार, 18/09/2018 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी मोदीभक्त तर मुळीच नाही पण सतत 18 तास कामात व्यस्त असणारे सध्याचे पंतप्रधान आणि डोळे मिचकवणारे लहरी महंमद भावी पंतप्रधान यातील फरक समजण्या इतका माझा मेंदू नक्कीच जागृत आहे .
मिपावरील आदरणीय सभासद अभिजित 1 यांनी मोदींनी गेल्या 4 वर्षात केलेल्या चांगल्या कामा संबंधित यादी योग्य त्या लिंक सहित बनविण्यास मला सांगितले होते .
लेखकहेमंतकुमारयांनी मंगळवार, 18/09/2018 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
(खनिजांचा खजिना : लेखांक ७)
या अंतिम लेखात आपण ५ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
मॅग्नेशियम :
हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे.
आहारातील स्त्रोत:
हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते.
शरीरातील कार्य
मॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते.