बघता मानस होते दंग (सायकलीवर पुणे- सातारा- कराड- मलकापूर- आंबा घाट- लांजा- राजापूर- देवगड- कुणकेश्वर) ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)
बघता मानस होते दंग ३: सातारा- कराड- मलकापूर (११४ किमी)
८ सप्टेंबरची पहाट. बाहेर बघितलं तेव्हा पूर्ण आकाशात ढग आहेत. लवकरच पाऊस सुरू झाला. आज नक्कीच पाऊस असणार. पण थोड्या वेळाने जेव्हा तयार होऊन सायकल घेऊन निघालो, तेव्हा आकाश अगदी निरभ्र! श्रावण सरींची गंमत आहे ही. सातारा! गावातून निघताना समोर पहा-यासाठी उंच उभा असलेला विराट अजिंक्यतारा दिसतो! मागच्या वेळच्या सातारा प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या! त्या आठवत अजिंक्यता-याच्या जवळून निघालो. सातारा शहराचं सौंदर्य परत एकदा बघायला मिळालं. अजिंक्यता-याच्या मागच्या बाजूने हायवेकडे जाताना काय सुंदर नजारे दिसत आहेत!
मिसळपाव