ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ
ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये अशी एक म्हण आहे, पण मला वाटते वयाच्या एका टप्प्यावर सगळयांनाच "कस्त्वं कोऽहं कुत आयातः" असे प्रश्न पडत असावेत आणि मग माणूस आपल्या मुळाचा म्हणजे मूळ ठिकाण गाव देश कुलदैवत वगैरेचा विचार करू लागतो आणि शोध घेऊ लागतो.
माझेही थोडेसे तसेच झाले आणि मी त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. बरीच वर्षे इकडे तिकडे चौकशी केली, जे जे कोणी मेहेंदळे आडनावाचे भेटत गेले त्यांच्याकडे विचारत गेलो. मध्ये मध्ये त्यात खाम्द पडत होता , नोकरीनिमित्ताने भटकणे चालू होते, पण हा विचार मनाच्या एका कोपऱ्यात कायम असायचाच की आपण कोण कुठले आता मूळ ठिकाणी काय असेल आपले कुलदैवत काय (तसे सर्व कोकणस्थांची कुलदेवी म्हणजे योगेश्वरी अंबेजोगाई आणि कुलदैवत म्हणजे कुठलातरी शंकर हे ठरलेले ) तसेच मी ही योगेश्वरीलाच कुलदेवी मानत आलो आणि आमच्या घरी कोणीतरी पूर्वजाने काशीहून आणलेली कालभैरवाची दगडी मूर्ती आहे ते कुलदैवत मानत आलो.
पण वडिलांनी कधीतरी सांगितल्याप्रमाणे मेहेंदळे हे देवरुखजवळ हिंदळे गावाचे आहेत असे माहित होते.या सुट्टीत कोकणात जायचा बेत होताच तेव्हा जमल्यास याही दृष्टीने काही समजले तर बघू असा विचार करून निघालो.
गणपतीपुळे आणि मालगुंडला मुख्य मुक्काम होता तेव्हा मालगुंडला श्री. अमित मेहेंदळे (स्वाद रेस्टोरंट ०२३५७-२३५ १६२ ) यांना फोन करून माहिती घेतली आणि रवाना झालो.
गणपतीपुळ्याला श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पुढे मालगुंडला पोचून श्री. अमित यांना भेटलो . त्यांच्या कडून माहिती मिळाली ती याप्रमाणे ---
मेहेंदळे लोकांच्या अनेक शाखा विस्तारत गेल्या आणि अनेक गावे मूळ म्हणून सांगता येतील देवरुखजवळचे हिंदळे ,मालगुंड आणि गणपतीपुळे ,पनवेलजवळ वारसाई ,वैजनाथ ,रोहा ,कर्जत जवळचे कोठिंबे कोढीमबे अशी अनेक. त्यातील तुमच्या घरात कालभैरवाला कुलदैवत मानतात म्हणजे तुम्ही हिंदळेचे असणार कारण तिथले ग्रामदैवताच मुळी कालभैरव आहे. पण तसे पाहायला गेले तर आपले मूळ कुलदैवत म्हणजे कोळिसरे गावाचे लक्ष्मी केशव आणि मुसळादेवी. आता लक्ष्मी केशवाचे मूळ स्थान अजून तेथेच आहे आणि मराठे नावाच्या गुरुजींकडे त्याची पिढीजात व्यवस्था आहे.पुरवी दरीत २५० पायऱ्या उतरून आत जावे लागायचे पण आता सरकारने मंदिर पर्यन्त चांगला रस्ता केला आहे. कानडे /जोशी / बापट अशा बऱ्याच लोकांचे हे कुलदैवत आहे.
पण मुसळादेवीचे मूळ स्थान मात्र आता कोणाला माहीत नाही. सर्व मेहेंदळे लोकांनी एकत्र येऊन पुण्यात २ संमेलने घेतली त्यातही हा विषय मुख्यत्वे चर्चेला होता.पण बरीच विचारपूस आणि शोधाशोध करूनही काही तपास लागला नाही. इतर घराण्याचा असतो तसा मेहेंदळे घराण्याचा कुलवृत्तांत सुद्धा अजून झालेला नाही. मात्र www.mehendale.इन अशी वेबसाईट तयार झालेली आहे.
शेवटी सर्वानुमते असे ठरले की आपण मुसळादेवीचे देऊळ परत बांधूया आणि स्थापना करूया. मालगुडला ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणातील जागा त्यासाठी मुक्रर केली गेली आणि बांधकामाचा सर्व खर्च ठाण्याच्या तनवी हर्बल वाल्या डॉ. मेधा मेहेंदळे यांनी केला. आता देवीची मूर्ती घडवताना तिच्या हातातले मुसळ उभे ठेवायचे की आडवे हे कोणाला माहित नव्हते पण आडवे मुसळ ठेवून मूर्ती घडेना. म्हणून एक दोन जाणकार लोकांचे मत घेऊन तिच्या डाव्या हाती उभे मुसळ आणि उजवा हात आशीर्वाद देताना अशी मूर्ती घडवली व तिची स्थापना केली गेली.
मेहेंदळे घराण्यात अनेक पराक्रमी आणि किर्तीवंत पुरुष होऊन गेले त्यापैकी काही म्हणजे पुण्याच्या "अप्पा बळवंत चौक " वाले अप्पा यांचे वडील बळवंत गणपत मेहेंदळे , हिंदुस्थान बेकरीवाले मेहेंदळे/ मेहेंदळे गेरेज /मेहेंदळे हाऊस/ठाण्याच्या तनवी हर्बल वाल्या मेधा मेहेंदळे यांचा उल्लेख वर आलाच आहे / इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे ,कल्याणचे दूधवाले मेहेंदळे/अलिबागचे आणि नागावचे मेहेंदळे आणि असे अजून अनेक ज्ञात अज्ञात मेहेंदळे असतील.
"दैवायत्तम कुळे जन्म मादायत्तन तू पौरुषम" अर्थात जन्म कुठे घ्यावा हे दैव ठरवते पण पराक्रम हा ज्याचा त्याने साधण्यावर असते ही उक्ती खरी आहेच पण केवळ आडनाव बंधूचे कौतुक म्हणून जी माहिती मिळत गेली ती वर सांगितली आहे.
असो. मला या विषयांत रस आहे तसा सगळ्यांनाच असेल असे नाही .कदाचित तुम्हाला हे लिखाण कंटाळवाणे ही वाटू शकते पण बोलण्याच्या ओघात जी माहिती मिळत गेली ती लिहिली आहे इतकेच.
याद्या
11768
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
अजुन एक गोष्ट सांगायची राहिली
सरदार बळवंतराव मेहेंदळे
In reply to अजुन एक गोष्ट सांगायची राहिली by राजेंद्र मेहेंदळे
रोचक शोधयात्रा !
अशातच कुठेतरी वाचले -आता
माहीतीबद्दल धन्यवाद
In reply to अशातच कुठेतरी वाचले -आता by माहितगार
महांदळे किंवा मांधळे तुमच्यात
In reply to माहीतीबद्दल धन्यवाद by राजेंद्र मेहेंदळे
नाहि बुवा
In reply to महांदळे किंवा मांधळे तुमच्यात by अभ्या..
देशस्थ ब्राह्मणात असते. बहुधा
In reply to नाहि बुवा by राजेंद्र मेहेंदळे
हेच खरे मुसळवान
In reply to अशातच कुठेतरी वाचले -आता by माहितगार
परवाच श्री. अमित मेहेंदळे
होय, जेवण छानच असते.
In reply to परवाच श्री. अमित मेहेंदळे by उगा काहितरीच
हिंदळ्याचे मेहेंदळे तर....
धन्यवाद गा.पै.
In reply to हिंदळ्याचे मेहेंदळे तर.... by गामा पैलवान
सिंध मधले 'मेहें चो दाळो '
In reply to धन्यवाद गा.पै. by राजेंद्र मेहेंदळे
खरं म्हणजे गावांच्या नावांचा
In reply to सिंध मधले 'मेहें चो दाळो ' by माहितगार
हसून घेतलेच, तरी पण
In reply to खरं म्हणजे गावांच्या नावांचा by माहितगार
व्युत्पत्ती शोधताना अनेक
In reply to हसून घेतलेच, तरी पण by राही
छान लिहिलंय.
अन्नपूर्णा
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
इथे आयुध हा शब्द शस्त्र ह्या
In reply to अन्नपूर्णा by राही
धन्यवाद प्रचेतस
In reply to छान लिहिलंय. by प्रचेतस
शस्त्र म्हणून आयुध हा शब्द
In reply to धन्यवाद प्रचेतस by राजेंद्र मेहेंदळे
ओके समजले
In reply to शस्त्र म्हणून आयुध हा शब्द by प्रचेतस
बलराम?
In reply to शस्त्र म्हणून आयुध हा शब्द by प्रचेतस
मुसळ नाही, नांगर. हलधर.
In reply to बलराम? by पैसा
मुसळ सुद्धा आहे
In reply to मुसळ नाही, नांगर. हलधर. by प्रचेतस
छान लिहिले आहे
फार सुंदर धागा . सुदैवाने
छान माहीती मिळाली.
सुंदर माहीती.