|| माझे बाबा ||
हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ||
त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी |
खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी ||
त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले |
म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले ||
हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1||
जुनी पुरानी कपडे त्यांनी शिवून शिवून घातली |
माझ्यासाठी प्रत्येक वेळेस नविन फ्रॉक घेतली ||
एकच जोडी चपल ते सांधुन सांधून घालायचे |
माझ्यासाठी पायघड्या ते काट्यांवरून चालायचे ||
त्यांच्याकडुन मला पण काही तरी शिकु दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे |
काव्यरस
मिसळपाव