होमिओपॅथी : उपचार की फसवेगिरी ?
आपल्या आजूबाजूला बरेच लोक ॲलोपॅथी ऐवजी होमिओपॅथी नावाची उपचारपद्धती अवलंबताना दिसतात आणि बरेच लोक या पद्धतीचे समर्थन देखील करताना दिसतात. या करिताच हा लेखाचा प्रपंच. तुम्ही जरी होमिओपॅथीचे समर्थक असाल तरी हा लेख पूर्ण वाचावा अशी विनंती आहे.
इ.स. १७९६ साली सॅम्युअल हानेमन (Samuel Hahnemann) या जर्मन व्यक्तीने होमिओपॅथीची सुरुवात केली. एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये जर एक विशिष्ट घटक (उदा. एखादे रसायन) व्याधी तयार करत असेल तर तोच घटक ती व्याधी झालेल्या व्यक्तिला निरोगी बनवू शकते अशी (अजब!) होमिओपॅथीची पहिली समजूत आहे.
मी का तुला पाहतो रे?
प्रस्तुत लिखाण झी मराठीवर रोज रात्री साडे आठ वाजता दाखवण्यात येणाऱ्या "तुला पाहते रे" ह्या मालिकेवर आधारित आहे. ही मालिका न बघणाऱ्यांना कदाचित लिखाणाचा संदर्भ लागणार नाही.
ऐकलंत का ?
ईशा निमकरच्या मावशीला हव्या असलेल्या एका विशिष्ट साडीसाठी विक्रांत सरंजामेंनी दोन मिनिटात आणि तेही एका फोनवर ती साडीची अख्खी कंपनी विकत घेतली...
झालं काय की, ईशाच्या मावशीला एका साडीचा रंग, दुसऱ्या साडीचं डिझाईन, तिसऱ्या साडीचा पदर, चौथ्या साडीचा पोत आणि पाचव्या साडीचं ब्लाउज पीस आवडलं. आता तिला हे सगळं एकत्र करून एका साडीत हवं होतं.एवढी साधी सरळ मागणी हो तिची. तर तो मुजोर सेल्समन चक्क नाही म्हणाला तिला.
सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ५
पहील्या चार भागांच्या लिंक्स.
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग १ - https://www.misalpav.com/node/43030
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग २ - https://www.misalpav.com/node/43057
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43162
सह्याद्रीतील शब्दचित्रे-भाग ३ - https://www.misalpav.com/node/43378
------------------------------------------------------------------------
सकाळी ऑफीसमध्ये आल्या आ
Taxonomy upgrade extras
विलक्षण १.०
अमेरिकेतील अलबामा राज्यातील गॉंडस डेन शहरातील एका विद्यर्थ्याला त्याच्या मित्रांची खिल्ली उडवण्याची-टिंगल करण्याची इच्छा झाली. जसे कोकिळेला चिडवण्यासाठी तिच्या कुहू-कुहू नंतर आपण ही कुहू-कुहू करतो तसले. पण या मुलाची पद्धत एकदमच वेगळी होती, केवळ वेगळी नसून विलक्षण सुद्धा होती.
दुधातील ए -१ व ए -२ घटकांबाबत भ्रामक प्रचार
पौराणिक कथा, संस्कृती व आहारात भारतामध्ये दुधाला वैशिष्ठपूर्ण स्थान आहे. दुधाला संपूर्ण अन्न मानले गेले असले तरी काही लोकांच्या मते दुध हे प्रोस्ट्रेट ग्रंथी व बीजांडा (ओव्हरी) चा कॅन्सर, टाईप-१ डायबेटीस, मल्टीपल स्क्लीरोसिस, रक्तातील क्लोरेस्टरॉल ची उच्च पातळी, वजन वाढणे व हाडांची ठिसूळपणा इत्यादी विकारांसाठी कारणीभूत आहे. निसर्गोपचारात, अस्थमा व सोरीयासिस च्या रुग्णांना तर दुध सेवन थांबविण्याचा सल्ला दिला जातो.
शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १
शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १
ऑफिसमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिटिंगमध्ये प्रोजेक्ट हेड साहेबांनी घोषित केले की “आपल्या ग्रुपची या वर्षीची सहल व्यवस्थापनाकडून मंजूर झालेली आहे, आता तुम्ही सहलीच्या नियमानुसार तुमची सहल निश्चित करू शकता !” हे ऐकल्यावर ग्रुपमध्ये आंनदाची लहर पसरली.
बंगळूरमधील आमचा ग्रुप म्हणजे एकदम युवा-तरूणांचा सळसळता ग्रुप. वयोगट २६ ते ३२. मीच एकटा फॉर्टी प्लस. लगेच आमचा टीम लिडर कीर्तीनाथने चेल्लनकुमारला सांगितले “चेल्लन, धिस टाईम, आय अम्म बिझी. यू विल ऍरेन्ज द ट्रिप.“ म्हटल्यावर चेल्लन लागला कामाला. दिवसभराचं आऊटींग ठरवत.
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
मळ्याच्या मळ्यामंदी पाटाच पाणी जातं,
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं.
माझ्या माहेरच्या पूर्ण वाडीत हे पाटाच पाणी पूर्वी झरझर वाहायचं आणि फक्त जाई जुईलाच नाही तर भाज्या, माड, सुपारी, चिकू अशा सगळ्याच झाडांभोवती पिंगा घालायचं. ह्या पिंग्यात पिंगा धरायला मला खूप आवडायचं.
वाडीत मध्यवर्ती ठिकाणी आमची विहीर होती.
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? (१/३)
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ?
भाग १/३
डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे.
प्रत्येक माणूस दररोज २०,००० पेक्षा जास्त वेळा श्वास घेतो - म्हणून अमुक अमुक प्रकारे रोज काही मिनिटे श्वास घ्या, म्हणजे कॅन्सर बरा होऊ शकतो, हृदयरोग बरा होतो, मन:शांती वाढते, पुष्कळ रोग बरे होतात, असे जर कोणी सांगितले तर हा हास्यास्पद भोंदूपणा वाटतो - पण गमंत अशी आहे, की ह्यात पुष्कळसे तथ्य आहे. ही जादू कशी होते हे ह्या लेखावरून समजेल.
जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?
मागील वर्षात जागितक बाजारात खळबळ उडाली ! ती या वर्षाच्या सुरवातीलाच देखील दिसुन येत होती. फेड ची प्रत्येक दरवाढ बाजार अशांत करत आहे.
या वर्षी फेडची दरवाढ आणि चीन यांच्या प्रत्येक घडामोडी पाहण्या सारख्या असतील असे मला वाटते... तर जालावर सध्या रिसेशन कधी येणार यावर चर्चा चाललेली दिसते. ट्रम तात्या भिंतीला चिकटुन बसले आहेत तर तिकडे क्रिमिया मध्ये रशियाने एस-४०० तैनात केले आहे.
मिसळपाव