Skip to main content

प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 12/01/2019 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्राणायामात या वर्षी नवीन काय शिकायचे ? भाग २/३ डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे. मागील भागाचा दुवा -http://aisiakshare.com/node/7041 (10)   प्राणायामात मेंदूत नक्की काय होते ?           सर्वसाधारण श्वसन हे अनैच्छिक असते आणि त्याचे नियंत्रण आयुष्यभर मेंदूतील एका छोट्या पेशीसमूहाकडून केले जाते. या पेशीसमूहाचा आकार काही मिलीमिटर इतका लहान असतो. त्यांचे कार्य काही वेळा औषधामुळे बदलू शकते.

'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/01/2019 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही.

विलक्षण २.०

लेखक दीपक११७७ यांनी शुक्रवार, 11/01/2019 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
बांबूच्या झाडाला फुले येणे हि एक विलक्षण घटना आहे. बरीच बांबूची झाडे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ठराविक कालावधीत बहरतात व मग नष्ट होऊन जातात. हा ठराविक कालावधी बांबूच्या प्रजाती निहाय वेग-वेगळा आहे. जसे; 1. Bambusa bambos या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 2. Phyllostachys bambusoides या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर १३० वर्षांनी एवढा आहे. 3. Chusquea abietifolia या प्रजातीचा फुले येण्याचा कालावधी दर ३२ वर्षांनी एवढा आहे. 4. Phyllostachys nigra f.

जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Re-Revisited)

लेखक राघव यांनी शुक्रवार, 11/01/2019 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
साडे तीन शहाणे आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा...(Revisited) हे दोन्ही धागे वाचलेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय असू शकतील याचं हे विवेचन आहे असं जाणवलं. पण एक विचार आला की प्रॅक्टिकल नेहमी उलट किंवा वाईटच का असावं? दु:खदायकच का? त्यातून तयार झालेला हा संवाद. सिनेमा संपतो. जगणं नाही. काही संवाद [मराठीतून] - . . . इमरानः काय रे मोरोक्को काय म्हणतंय? लैला: काय मोरोक्को घेऊन बसलाहेस अजून. आम्हीही कामं धामं करतो म्हटलं.. :-) इमरानः ओह.. लैला.. मस्त वाटलं आवाज ऐकून!