Skip to main content

सामाजिक उपक्रम -२०१९

लेखक निशदे यांनी सोमवार, 18/03/2019 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सामाजिक उपक्रमाचे हे आपले दहावे वर्ष. मित्रपरिवाराच्या आणि साथीने गेली ९ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे दहावे वर्ष आहे.

विशाल राज्य

लेखक शब्दानुज यांनी सोमवार, 18/03/2019 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल राज्य होते एक , लोक जिथले विचित्र पाठीवर टांगलेले आरसे आणि गळ्यात मोठे पात्र स्वमताची पिंक दुस-याच्या पात्रात मारत रहायचे आपले प्रतिबिंब दुस-याच्याच पाठीवरी पहायचे पात्र ते गळ्यातले कधीच धूवायचे नाही एकमेकांच्या घाणीचे इथले सर्वच भारवाही एक गोष्ट मात्र परि इथे स्वताःची असे पांढराशुभ्र सदरा इथे जन्मजात मिळत असे चालताना लोक आरश्यावर धूळ उडवत जात असे प्रत्येकास आपलाच सदरा मळकाच दिसत असे "मळकट" सदरा ,कळकट पात्र , बळकट इथले आरसे अोझ्यानेच त्या प्रत्येक माणूस झुकून इथे चालत असे

आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती

लेखक कंजूस यांनी शनिवार, 16/03/2019 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
इतर लेख आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था आकाशदर्शन - संदर्भ पद्धती 'आकाशदर्शन - सुरुवात आणि ओळख' या मागच्या भागात आपण सूर्याची रास आणि वर्षाचा महिना - तारीख याचा संबंध पाहिला. तसेच सूर्य मावळल्यावर साधारणपणे कोणती रास डोक्यावर, कोणती रास पूर्वेला उगवत असणार हे कळले.

सुधारीत जीवनशैलीच्या शोधात....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी शुक्रवार, 15/03/2019 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छंदी जीवनाची परिणिती, वाढत्या वयाबरोबर रोज नविन दुखण्याचा शोध किंवा नविन समस्या उद्भवल्या नाहीत तर जुन्याच समस्या तिव्रतेने जाणवण्यात होते. ऐन तारूण्यातली जागरणं, अरबट चरबट आणि वेळी अवेळी खाणं त्या त्या वेळी खुप सुखाऊन गेली. पण पन्नाशी नंतर कांही शारीरिक कुरबुरी सुरू झाल्या. तसं गंभीर कांही नव्हतं पण थकवा जाणवायचा म्हणून एकदा डॉक्टरांच्या दवाखान्याची पायरी चढलोच. म्हंटलं कांही तरी मल्टीव्हिटॅमिन वगैरे देतील थोड्या दिवसांकरीता आणि सर्व ठीक होईल.

आकाशदर्शन (१) - सुरुवात आणि ओळख

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 15/03/2019 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
इतर लेख आकाशदर्शन (२) - संदर्भ पद्धती आकाशदर्शन (३) - कार्यक्रम करणाऱ्या संस्था आकाशदर्शन - सुरुवात आणि ओळख गाभा आणि ओळख समुद्रमार्गे आणि जमिनीवरून विशेषत: वाळवंटातून पूर्वी व्यापारी रात्रीचा प्रवास करत असत तेव्हा आकाशातील ताऱ्यांचा दिशादर्शक म्हणून उपयोग होत असे. ग्रीक आणि अरब व्यापारी यात पुढे असल्याने त्यांचा गाढा अभ्यास होता. ताऱ्यांची नावे त्यांच्या भाषेतील असण्याचं मुख्य कारण तेच आहे. विशेष तारकापुंजातील ताऱ्यांना ग्रीक पुराणातील नावे देऊन त्यांच्या कथा आहेत.

पाणी आंदोलन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/03/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे या लेखात सटाणा शहराचा विचार केला असला तरी सर्वदूरच्या (महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र) वाचकांनी सटाणा हे शहर उदाहरणार्थ म्हणून समजावं. ज्यांनी दूरदृष्टीने जल व्यवस्थापन केलं नाही अशा सर्व गाव- शहरांत कमी अधिक प्रमाणात या वर्षी पाणी टंचाईची अशीच भीषण अवस्था आहे : सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस- चाळीस वर्षांपासून तसाच टांगणीला पडला आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्प्रतचारासारखं सटाण्याचं झालं आहे. पाणी टंचाई झाली की बोलायचं. नदीला आवर्तन सुटलं की आपल्यापुढे पाण्याचा प्रश्नच नाही असं वागायचं. जमिनीत बोरवेल करून जो तो आपापला पाणी प्रश्न सोडवू पाहतो.

राखून ठेव दुधाचे थेंब तू

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 15/03/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
राखून ठेव दुधाचे थेंब तू मज पाडसा पाजावया रक्त माझे शोषलेस काही नाही त्यास द्यावया घास देई तू मजप्रती दुध देते मी म्हणोनि अर्थ नाही, व्यर्थ आहे जीवन शिंगे असोनि कामधेनु, गोमाता नावे मज अनेक ती भाकड पैदा होता खाटीकास विकती निचाहूनी नीच तू तुझ्यासम कुणी नसे धर्माचे स्तोम फक्त अंतरी आत्माच नसे विकशील का मुलीला ? वांझ जर असेल ती जरा खरचटता तिला झोपही उडेल ती वळू नको, भाकड नको दुभती गाय पाहिजे माग तू याच जन्मी मग नरकात जायचे (( सिद्धेश्वर विलास पाटणकर ))

मरणाचं अर्थशास्त्र

लेखक अबोलघेवडा यांनी शुक्रवार, 15/03/2019 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
काल बातमी आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघणारा फूट ओव्हर ब्रिज कोसळला. काही माणसं मेली. कसंही मरण येऊ शकतं आपल्या देशात. कोणी उघड्या गटारात पडून मरतं, कोणी रस्त्यावरच्या सुट्या विजेच्या तारेला धक्का लागून मरतं, कोणी झाड पडून मरतं. कोणी भिंत पडून मरतं तर कोणी इमारत कोसळून मरतं. कोणी सरकारी दवाखान्यात योग्य उपचार न मिळाल्याने मरतं तर कोणी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडून मरतं. कुठेना कुठेतरी या सगळ्याची मुळं भ्रष्ट सामाजिक व्यवस्थेत आणि मानसिकतेत असतात. आपण तरी धुतल्या तांदळासारखे पवित्र कुठे असतो? काही जणं 70% भ्रष्ट असतील तर कदाचित आपण 30% च असू.