Skip to main content

चवणेश्वर अप्रतिम सौंदर्य

लेखक mukund sarnaik यांनी शुक्रवार, 18/01/2019 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
चवणेश्वर ' सातारा शहरापासुन पुढे २८ मैल चवणेश्वराच्या पायथ्याशी निसर्गाची कृपा व वनश्रीने नटलेले कंरजखोप गाव आहे. गाव लहान आहे वस्ती बारासे ते तीन हजार पर्यंत आहे.ब्राह्मणाची घरे बोटावर मोजण्याइतकी आहेत.या गावातुन चवणेश्वराला रस्ता जातो.गावातील पाटिलकी धुमाळ यांच्याकडे आहे.तर जोशीपण(पुजारी) वाघ यांच्याकडे आहे.गावात बहुतअंशी धुमाळ आहेत इतर लोक थोडे.गावात यायला कच्ची पायवाट आहे.S.T स्टॅन्ड समोर जुनी देवीची विहीर अाहे म्हणे !

तुझी कविता

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 18/01/2019 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ५ (अंतिम भाग)

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 18/01/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी ब-याच दिवसानंतर ही लेखमाला पुर्ण झालेली आहे. रसिक दाद देतील ही अपेक्षा –------- पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. बाजूच्या झाडावर बसलेले पक्षी तेव्हढे किलबिलाटाने शांततेचा भंग करत होते. हा भाग माझ्या घराच्या शेजारचाच होता. मात्र घरी जाण्याचा आत्ता काहीच फायदा नव्हता कारण आता ते साखरझोपेत असणार होते. वेळ जावा म्हणून मी आजूबाजूला फिरत वेळ घालावला. फिरता फिरता आमच्या नेहमीचे सलूनचे दुकान लागले. तोही नुकताच आला होता. दुकान उघडून दुकानाच्या बाहेरची बाजू तो झाडून काढत होता. मी सहज आत गेलो आणि कॅलेंडर बघितले तर कॅलेंडरवर मागचा महिना दिसत होता.

अनामिक

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 18/01/2019 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
खरी कविता कधी येते माहितीये का? जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!! तीच तिची खरी-यायची वेळ.. तिला मग यमकांची, छंदांची, वृत्तांची, कसलीच गरज उरत नाही.. खरोखर अनावृत्त होऊन छंदमुक्तीचा खरा ध्यास घेऊनच धावत येते ती! . वेदना जागायची, स्वतःहुन चालत बोलत घडत धडपडत बाहेर यायची खरी वेळ.. काहीही सुचायची, सांगायची, बोध शिकवायची, ओझी डोक्यावर न घेता ती सताड उमटते बाहेर! जशी आत आहे तशीच!!! हीच तिची खरी सुरवात मानायची का हो!??? असेल, असेल कदाचित..आणि असू दे ..असली तरीही!
काव्यरस

वारकरि

लेखक mukund sarnaik यांनी गुरुवार, 17/01/2019 23:02 या दिवशी प्रकाशित केले.

ढग

लेखक सागरलहरी यांनी गुरुवार, 17/01/2019 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
तोच पाऊस जुनासा गंध हळवा नवासा भिजू भिजू पदराला मखमल स्पर्श हवासा स्पर्श रुते खोल पापण्याशी ओल पुन्हा ऊन पदराला अन एक उसासा उसासलेलं हसू मोरपंखी दिसू काळा करंद ढग डोळा ये जरासा सागरलहरी

वारकरि

लेखक mukund sarnaik यांनी गुरुवार, 17/01/2019 20:10 या दिवशी प्रकाशित केले.

दर महा १०% परतावा शक्य आहे का?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 17/01/2019 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोक हो केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत). सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो. खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत. 10pc