मक्याच्या दाण्यांची भाजी
साहित्य :
सोपी पण चविष्ठ अशी होते ही भाजी. मी आजच केलीये. म्हणून शेअर करते आहे. पटकन आणि छान होणारी.
मक्याचे काढलेले दाणे, नेहमीचे फोडणीचे साहित्य, चणाडाळीचे पीठ, एक मध्यम चिरलेला कांदा, वाटलेले ओले खोबरे, मीठ.
काढलेले मक्याचे दाणे मिक्सरला जर्रा फिरवून घ्यायचे. जास्त फिरवले तर लगदा होतो. नुसतं एकदोनदा फुर्र फुर्र केलं तरी पुरे. एका दाण्याचे चार तुकडे होतील इतपत भरड करायचे. जर जास्त पीठ झाले तर भाजीचा बेत कॅन्सल करून उपमा करावा. फिरवताना पाणी घालायचं नाही. थोडं पाणी वाटताना सुटतं. तेवढं पुरे.
फिरवून घेतलेले दाणे कुकरला लावायचे. मी वरण भातावरोबरच लावते तिसर्या पुडात.
मिसळपाव