Skip to main content

शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 29/08/2019 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण
काव्यरस

शाली आणि तो

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 29/08/2019 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तब्बल तीस वर्षांनी तो त्याच्या गावाला चालला होता. तीस वर्षात सगळ काही बदलल होत. तो बदलला होता. भोवतालचा परिसर बदलला होता. गाव बदलला होता. एवढच काय पायाखालची वाटही बदलली होती. कच्च्या रस्त्याच्या जागी पक्का रस्ता आला होता. काळाच्या प्रवाहात सगळ काही बदलल होत.       मनात विचार करतच तो चालला होता. अंगात सैल कुडता, त्याखाली तशीच सैल आणि ढगळ पँट, वीतभर वाढलेली दाढी. ती त्याने मुद्दाम वाढवली होती. दाढीला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि खांद्याला अडकवलेली शबनम पिशवी. एकंदरीत सगळा साधा आणि सरळमार्गी पेहेराव होता त्याचा. पेहरावाला शोभेल असा गरीब आणि भोळा चेहरा.

रुसण्याची मजा

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 29/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी भावभावना किती सुरेख असतात, नाही? त्यातही कित्येक वर्षांपासून चर्चिला जाणारा आणि पुढील अनेक वर्षात देखील अजिबातच शिळा न होणारा विषय म्हणजे प्रेम! त्यातही हे प्रेम जर प्रियकर प्रेयसी या प्रकारातले असेल तर मग विचारायलाच नको. आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी हा विषय टाळता येणं तसं अवघडच. बरं गंमत म्हणजे ह्या नात्यात काही ठराविक मार्गच नेहमी आपलेसे केले जातात. एकदा प्रेमात पडलात की कोणी काय करायचं आणि त्याहीपेक्षा काय नाही करायचं हे जवळपास ठरलेलंच असतं. म्हणजे बघा ना कितीही नवी पिढी असली तरी काही गोष्टी ह्या क्वचितच बदलतात. ह्या सुंदर नात्यात खूपशा भावना आहेत.

पुस्तक

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 29/08/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच माझ्या मनात एक विचार आला. पुस्तक लिहायचा. या पुस्तकाची संकल्पना मी तुम्हाला सांगणार नाही. पण हे नक्कीच वेगळ्या धाटणीचे पुस्तक ठरावे असा माझा प्रयत्न होता. कधीकधी पुस्तकाचे नावच त्याचा गाभा उलगडून दाखविते. म्हणून पुस्तकातील पहिल्या लेखाचे पहिले अक्षर लिहिण्याआधी मी पुस्तकाचे नाव निश्चित केले... ‘युद्ध आमुचे सुरू!’... ज्या डायरीत माझे हे संकल्पित पुस्तक हस्तलिखित स्वरूपात संपन्न होणार आहे, त्या डायरीच्या पहिल्या पानावर मी झोकदार अक्षरात हा मथळा लिहून टाकला आहे. ‘युद्ध आमुचे सुरू!’ ...

श्री गणेश लेखमाला २०१९ - झलक पाचवी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 29/08/2019 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता गणपतीच्या आगमनाच्या प्रतीक्षेचा काळ संपत आलाय आणि भाद्रपद येता येता गणरायालाही सोबतच घेऊन येतो आहे. आजवर घडलेलं सारं भलं-बुरं काही काळासाठी बाजूला ठेवून आता गणपतीच्या स्वागतासाठी तयार राहायचं. येणाऱ्या ह्या पाहुण्याचं आपापल्या परीने मनापासून आगतस्वागत, पूजन करायचं आणि सर्वे भवन्तु सुखिनः असं आशीर्वचन मागायचं. मिपाच्या गणेश लेखमालेवरसुद्धा आता शेवटचा हात फिरवून होत आलाच आहे. लेख, चित्रं, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स, सजावट, लिखाणामधले मुद्रणदोष.. एक ना दोन, कित्येक लहान लहान गोष्टी पुनरेकवार पडताळून पाहणं सुरू आहे.

ओठात दाटलेले...

लेखक निलेश दे यांनी बुधवार, 28/08/2019 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
ओठात दाटलेले ते भाव ओळखीचे सांगू नकोस आता ते गाव ओळखीचे हातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही घेवू नकोस आता ते नाव ओळखीचे सोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी दावू नकोस आता ते घाव ओळखीचे गावात बांधलेला वाडा उजाड आहे पाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे सोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही खेळू नकोस आता ते डाव ओळखीचे निलेश देऊळकार अडगाव बुll 9767888855
काव्यरस

संध्याकाळचा पेग ..

लेखक चामुंडराय यांनी बुधवार, 28/08/2019 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचा पेग .. जगातली सर्वोत्तम सुखे अगदी स्वस्तात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच ( हा 'कोणीतरी' कोण म्हणून काय पुसता कीबोर्ड वर बोटे आपटूनी? मीच की तो !). तर स्वस्त मिळणाऱ्या सुखांपैकी "संध्याकाळचा पेग" ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. मस्त संध्याकाळ असावी. सूर्य क्षितिजाकडे झेपावत असावा. किंबहुना नुकताच क्षितिजा पल्याड गेलेला असेल तर अति उत्तम. हुरहूर लावणारी सांज असावी. पोट हलके असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत जाण्यास उत्सुक असावे. हलकेच एक लार्ज पतियाळा भरावा आणि सोबतीला चखना असावा. अहाहा .... फक्त अर्धा पाऊण तास!...

'तंबोरा' एक जीवलग

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी बुधवार, 28/08/2019 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
गाणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जवळचा सखा. एक भारदस्त आणि गाण्याचं अविभाज्य अंग असलेला मैफिलीचा घटक. हिंदुस्थानी शास्त्रीय कंठसंगीताच्या अर्थातच सुरांच्या सृजनाचा अवयव. स्वरांची बीजं ज्याच्यातून उत्सर्जित होऊन गाणाऱ्याच्या मनात प्रस्थापीत होतात तिथं गाणाऱ्याची प्रतिभा आणि हे स्वरबीज यांचं मिलन होतं. कंठावाटे प्रसवतात ते निरागस सुर. तो निर्मीतीक्षम अवयव अर्थातच तंबोरा! तंबोरा एक जीवलग सुरात लावलेल्या जव्हारीदार तंबोऱ्य़ांचा झनकार गुंजत असावा.

डुबुक !!

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी बुधवार, 28/08/2019 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
“नानी ये देखोsss!”, “नाना ये देखोsss!”. आमच्या ४ वर्षाच्या नातवाच्या डोळ्यातील चमकदार भाव, अत्यंत आनंदानी उड्या मारत हातातला डायपर आमच्यापुढे नाचवत नाचवत तो उत्साहानी, आनंदानी दाखवत होता आणि आईला कसं शेवटी माझं ऐकावंच लागलं आणि मला ‘ते’ तिला द्यावंच लागलं, अशा विजयी नजरेनी तो अगदी ‘सुखावला’ होता. लगेच त्यानी ‘ते’ घातलं आणि तो ‘ब्रम्हानंद’ घेण्यात रमला. आणि इकडे त्याची आई म्हणजे माझी मुलगी “आई बघं ना गं, त्याला शेवटी डायपर द्यावंच लागलं, आज चौथा दिवस. डायपरशिवाय त्याला 'ते' होत नाहिये आणि त्यामुळे आता तो काही खातपीतपण नाहिये!