Skip to main content

अश्रू

लेखक प्रणया यांनी शुक्रवार, 12/04/2019 या दिवशी प्रकाशित केले.
पाणावलेल्या डोळ्यांमधुनी काय निखळले अश्रू होऊनी सुरुवात जाहली सांडायला काय भावना होत्या त्या, त्या, का नाही टिपल्या पापण्यांनी रूळली अधरांवरती काही, काही ओघळली गाली काय मोल त्या आसवांना , ते तर फक्त खारट पाणी असो विरह कि सुखाची मिठी एकसारखे थेंब मग ओळखावी कशी चव वेगवेगळ्या भावनांची कोणी..... - प्रणया
लेखनविषय:

वाचने 2508
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

असो विरह कि सुखाची मिठी एकसारखे थेंब मग ओळखावी कशी चव वेगवेगळ्या भावनांची कोणी....
. सुरेख ! आवडली कविता.