Skip to main content

मेळघाट ...

लेखक गणेशा यांनी बुधवार, 27/11/2019 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे ललाटी, निष्प्रभ आभाळ रे.. पोटाच्या खळगीची, ही आबाळ रे.. तुमचे सूर्य तारे, तुमचेच मळे हिरवे गार रे,.. आटलेल्या पाण्यातला, आम्ही गाळ रे.. काळ्या जमीनीवर फक्त तुमचाच मान रे पाण्याविना आमचे रान सारे खडकाळ रे भविष्यात नसलेले माझे हे गाव रे भुकेले बालपण आमचे तू सांभाळ रे .. क्रुर नियतीचा नशिबी खोल वार रे मरण लिहिलेला माझा हा भाळ रे - -शब्दमेघ ... मेळघाट डायरी २७/११/२०१९ (खुप वर्षांनी काव्य विभागात पुन्हा या शिघ्र कवितेतुन)
काव्यरस

दोसतार - २४

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/11/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा http://misalpav.com/node/44978
चालत सुटलो तर शंका समाधान होऊन खरा धबधबा दिसेल या विचाराने महेश पुढे चालायला लागला. अव्याचा नाईलाज झाला. त्याला त्याची शंका सोडवेल असा कोणीच दिसेना. अर्थात त्याने काही फारसे बिघडणार नव्हते. अव्याला दिवसभरात पुन्हा एखादी नवी न सुटणारी शंका सुचेल आणि ती कोणीतरी सोडवेल याची खात्री होती.
धबधबा दिसणार या विचारानेच सगळे पुन्हा ताजेतवाने झाले. गेलेला चा दम परत आला . मलूल झालेल्या फुग्यात पुन्हा हवा भरल्यावर दिसावा तसे आमचे चेहरे पुन्हा चमकू लागले.

अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज )

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 26/11/2019 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
अति भूकंप राज्यपालांनी वैतागून दिला राजीनामा (फेकींग न्युज ) नुकत्याच मिळाल्या बातमीनुसार अजित पवार ह्यांनी उमु आणि देवेंद्र ह्यांनी मामू पदाचा राजीनामा दिला अजित पवार छातीत दुखते म्हणून रुग्णालय भरती सोनिया गांधी ह्यांनी काँग्रेस गट नेत्या पदाचा त्याग केला अभिजीत बिचकुले ह्यांनी राजकारण सन्यास घेतला राहुल गांधी ह्यांच्याकडे कुठेलेच पद नसल्याने ते आधी काँग्रेस अध्यक्ष पद घेणार मग सोडणार शरद पवार ह्यांनी दुसरा पर्याय जमणार नसल्याने तंबाखू गुत्य्ख्याचा त्याग केला निम्मे पत्रकार बांधव आता पर्यन्त स्वतः वेड्यांच्या रुग्णालयालयात भरती झाले आहेत व उरलेल्यानी आपल्या विश्वसनीय (?) सूत्

त्याचं दु:ख…

लेखक मनिष यांनी मंगळवार, 26/11/2019 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
* १ * संसदेला, संविधानाला नमस्कार करतात कायद्यांसाठी मात्र चोरवाटाच वापरतात तेंव्हा लोकशाहीची जी पायमल्ली होते, त्याचं दु:ख… खूनी, दंगलखोर मंत्री होतात आपापल्या केसेस बंदच करतात तेंव्हा कायद्याची जी चेष्टा होते, त्याचं दु:ख… कायद्याच्या पकडीतून नेते सुटतात समर्थनार्थ नंदीबैल उभे करतात खुद्द गुन्हगेारच जेंव्हा कायदे बदलतात, त्याचं दु:ख… राजकारणात सध्या असेच चालते साधन शुचितेची अपेक्षा नसते पण कपटालाच चाणक्यनीती मानले जाते, त्याचं दु:ख… सहभागाविना चर्चा, निर्णय होतात तुघलकी पध्दतीने जाहीर करतात तेंव्हा विश्वासावर जो घाव होतो, त्याचं दु:ख… कपटी नेते कारस्थानं करतात निषेधाचे

सायकलच्या आठवणी

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 26/11/2019 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
एका गल्लीतून पोरांचा घोळका सायकलींवरून बाहेर पडला, त्यांना बघून मी थांबलो. पुढच्या सिग्नलपर्यंत त्या पोरांनी रस्ता अडवला होता. मग ती परत एका गल्लीत घुसली. बहुतेक एका क्लासवरून दुसऱ्या क्लासला जात असावी. पण त्या पोरांमुळे माझ्या सायकलीच्या आठवणी जाग्या झाल्या. मी आणि माझी सायकल 'एक दिल एक जान' होतो तेव्हा. शेजारच्या मित्राकडे, म्हणजे दोन इमारतीसोडून राहणाऱ्या मित्राकडे जायला मला बुडाखाली सायकल लागायची. आई बाबा वैतागायचे कधीतरी पण लक्ष नाही द्यायचे. इयत्ता पहिलीच्या शेवटी माझी सायकल आली. आठशे ब्याऐंशी रुपयांची.

ना देवेंद्र देव इथे , ना उद्धव आहे साव

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 26/11/2019 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ना देवेंद्र देव इथे ना उद्धव आहे साव आजही बळीराजा भीक मागतो पण , त्याला काडीचा नाही भाव संगीत खुर्ची चालू झाली पवार वाजवतायत बिगुल हरेक पठ्ठ्या मग्रूर इथे पण आपलीच बत्ती गुल किती बघावं , काय बघावं कळत नाही काहीच जो तो आम्हाला नाग वाटतो आपला वाली कुणी नाहीच का लावला डाग नखाला ? डोक्याची झालीय भेळ कोण बसणार खुर्चीवरती यातच चाललाय वेळ लाज बाळगा जरा मनाची पुरे हि शोभायात्रा लोकप्रतिनिधी निवडून दिलेयत कि वेड्यांची भरलीय जत्रा कुणीही बसावे , काही करावे आता मेलेय माझे मन डाग पुन्हा कधी लावणार नाही हा करतोय आज मी पण सिद्धेश्वर विलास पाटणकर

अर्ज है की..

लेखक आजी यांनी मंगळवार, 26/11/2019 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक अर्ज भरत होते. तो इतका किचकट होता की,तो भरता भरता माझी दमछाक होत होती. संपूर्ण नाव, पत्ता-घरचा, पत्ता-ऑफीसचा, तात्पुरता, कायमचा. मग फोन नंबर. घरचा, ऑफीसचा, लँडलाईन, मोबाईल. मग पतीचे संपूर्ण नाव,ऑबलिक/पित्याचे संपूर्ण नाव. आईचे माहेरचे, सासरचे संपूर्ण नाव. आधार नंबर, पॅन नंबर.. मसणं नि माती. सतराशे साठ चौकशा. हा अर्ज फाडून टाकून, पेन फेकून देऊन, बाणेदारपणे घरी निघून जावं आणि मस्तपैकी एसी लावून झोपून जावं असा विचार मनात आला. पण तसं करणं शक्य नव्हतं. अर्ज भरणं भाग होतं. त्यात माझाच फायदा होता. असं नेहमीच होतं.अर्जाचा फॉर्म भरायचा मला नेहमीच कंटाळा येतो. बँकेत जा, अर्ज.

यशाचे आता गा मंगल गान

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 25/11/2019 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
यशाचे आता गा मंगल गान विजय मिळाला, आनंद झाला, यशाचे आता गा मंगल गान बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या, समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ|| बलाढ्य असा तो शत्रू होता, तोफा बंदूका शस्त्रसज्जता फंद फितूरी किती करविली, अंती आपणच ठरलो विजेता विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१|| युद्धखोरपणा उगा नका दाखवू, शत्रृ रणांगणी पाहून घेवू युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस, लढता लढता मरण पत्करू शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२|| - पाषाणभेद २५/११/२०१९