Skip to main content

निनावी कथा

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 11/10/2019 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला....

आणि आषाढी पावली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 10/10/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे... रवींद्र दत्तात्रय तेलंग काही प्रसंग आठवणीत घर करून जातात. 12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली. कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या.

अना ..... अर्थात क्रोएशियन समाज ..!!!!!!!

लेखक स्मिता दत्ता यांनी गुरुवार, 10/10/2019 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून समुद्रावर फिरायला गेलो. तिकडे तुरळक लोक जॉगिंगला आलेले. बरेचसे लोक कुत्र्यांना फिरवायला घेऊन आलेले. कुत्र्यांना फिरवणारे सर्रास सगळीकडे दिसतात. एकूणच युरोपात कुत्री, मांजर पाळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यांची कुत्री पण शिस्तीची असतात. उगाच कुणाच्या अंगावर धावून जात नाहीत आणि उगाच भुंकत हि नाहीत. कितीतरी कुत्री मोकळीच निवांत चाललेली. मागून त्यांचे मालक येत होते. नेहमीचे लोकं आणि त्यांची कुत्रीही गप्पा मारताना दिसत होते. रस्त्यावर कुठेही कुत्र्याची घाण दिसत नाही. जबर दंड असतो त्यासाठी.

सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

लेखक खिलजि यांनी बुधवार, 09/10/2019 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ? अरे देवेंद्रा , तुला झालंय तरी काय चुलीत गेली प्रगती सारी ठेव ती मेट्रो तुझ्याच दारी मुक्यांचा जीव तुला खाऊ वाटला काय सुधीर राव आहेत कुठं ?

हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला

लेखक हस्तर यांनी बुधवार, 09/10/2019 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
२ऑक्टो अर्थात गांधी जयंती ला खास वार चित्रपट प्रदर्शित केला गेला होता बुधवार आम्ही पण पण बघतील मग वार तुम्ही बघितला असेल तर कोणी पण मदत करू शकत नाही आणि तिकीट बुक केली असेल तर आत्ताच रिफंड मागा १) टायगर श्रॉफ ह्याने एक मोठी कमी भरून काढली आहे ,अभिनयाची ची नाही तर आयटम बॉय ची त्याचा अभिनय बघून म्हणाल टायगर सोड ,चित्रपट करणे नाही तर श्वास घेणे २) जेव्हा जेव्हा टायगर चे डायलॉग सुरु होतात तुम्ही उभे राहणार टाळी किंवा शिटी वाजवायला नाही तर समोरच्या माणसाला गप्प करायला जो शिव्या द्याल उभा राहिलेला असणार आहे ३) वार मूवी बघताना तुम्ही चित्रपट समरस व्हाल डोके ह्रितिक आणि काळीज टायग

आमार कोलकाता - भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 09/10/2019 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.

दसरा

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 08/10/2019 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवकन्या

दसरा आणी श्रीखंड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
आला दसरा............ दसरा आणी श्रीखंड दसरा आणी श्रीखंडा चे एक अतूट नाते आहे.. लहान पणी चक्का तयार करणे म्हणजे साधारण ३-४ आधी दिवस तयारी असायची. साय साठवणे ..व सा~याना पुरेल इतक्या श्रीखंडा इतके दही झाले कि मग ते एका फडक्यात बांघून ते भिंतीला टेकेल अश्या रितेने खुंटीला टांगले जायचे..ज्या मूळे त्यातले पाणी भिंत शोषून घेई व घट्ट चक्का बनत असे. पूर्वी भिंती भेनड्याच्या म्हणजे मातीच्या विटाच्या असायच्या.. सकाळीच चक्का व प्रमाणात साखर .. दुध घालून घोटणे सुरु व्ह्यायचे.. मग सहाणीवर दुधात जायफळ उगाळणे.

आहा ते सुंदर दिन हरपले

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 08/10/2019 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आहा ते सुंदर दिन हरपले --------------------------------- निवांत क्षणी आठवणीच्या गल्लीत फेरफटका मारला स्वीट होम आठवले स्वीट होम उपाहार गृह मंडईतून आठवड्याची भाजीपाला खरेदी झाली कि कुमठेकर रोड वरील हे उपहार गृह त्याला भेट दिली नाही असा पुणेकर विरळाच इडली सांबार -साबुदाणा खिचडी -व उपमा ह्या त्या हॉटेल मधल्या फेमस डिशेस त्या काळी इडली सांबार वर शेव भुरभुरली जात असे नव्या पिढीला माहीत नसेल पण इडली सांबार च्या बाउल मध्ये दोन चमचे सायक तूप घातले जाई फोडणीत भरम साठ कोथिंबीर व तिखट असे त्यामुळे सांबार वर तर्रि चा तवंग असे हटके चवीचं सांबार खावे तर स्वीट होम मध्ये उपमा पण हटके चवीचा असे वर शेव भुरभुरली