कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९
### कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९ ###
खूप दिवसानंतर लिहायचा योग आला आहे निमित्त आहे कोल्हापूर ट्रायथलॉन २०१९
मागच्या वर्षी ट्रायथलॉन झाल्या बरोबर ठरवलं होत की पुढच्या वर्षी परत नक्की करायचं, कारण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता, हो हो सोहळाच. मग काय एप्रिल मध्ये ट्रायथलॉन ची तारीख आली आणि लगोलग आम्ही सगळे मित्रपरिवाराने नोंदणी केली.
झालं एकदाची नोंदणी, ट्रायथलॉनला अजुन ६-७ महिने आहेत तेवढ्यात होईल तयारी असा विचार करून शांत राहिलो.. त्यात उन्हाळा सुरू झाला म्हणून म्हटलं नंतर तयारी करू, मग काय पावसाळा.
मिसळपाव