दूष्काळ झळा...
लेखनविषय:
काव्यरस
चोचभर दाण्यासाठी
वेशी बाहेर पाखरं
टीचभर पोटासाठी
घर उंबर्याशी वैर ||
पाणी आटलं डोळ्यात
शेत जळलं रानात
पोर धाडलं शरात
गाव दुष्काळ पिडित ||
कधीची दारातली तुळस .. कोरडी फट्ट काळी... हं, गोठ्यातली गाय, कत्तल खाण्यात कापली...
पांढर्या रानागत गावपोरींची कपाळं...दादल्यांनी त्यांच्या, जेंव्हा होता आवळला फास...
नाही गोठ्यामधी माय
ना टोपल्यात भाकर
गुलछडी उभी पेटली
काऴळ ठिक्कुर घर ||
शेतकरी हा अन्नदाता, हे सगळंच झुट... त्याच्या दाताखाली, अन्नाचा कुठ हाय तपास...
शासनाची पांढरी बुजगावनी.. फिरतात कधी शेतात, धा रुपडं हातात टेकवून टिव्हीत मिरवतात..
कणसात नाय दाणं
रीती कापसाची बोंड
जगण्याच्या अट्टासाची
गळी अडकली धोंड
गळी अडकली धोंड ||
त्याच मरण कोणत्या फांदिवर लटकलय , माहीत नाय.. पण एव्हड कळुन चुकलय..
मोठ्ठा मोठ्ठा असा कोण नसतो .. दुष्काळाच्या ह्या वनव्यात फक्त शेतकरी पेटतो.. फक्त शेतकरी पेटतो...
--- शब्दमेघ (गणेशा) _'रानातली वाट.. एक न संपणारा परिघ' ..पुन:प्रकाशित
वाचने
5583
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
चांगली रचना. सल बोचरी आहे.
कविता काळजापर्यंत पोहोचली.
अस्वस्थ करुन सोडणारी कविता
गणेशा , माझा मित्र आहे ,
In reply to गणेशा , माझा मित्र आहे , by जॉनविक्क
तुम्ही म्हणता ते बरोबर आहेच ,
In reply to तुम्ही म्हणता ते बरोबर आहेच , by गणेशा
कोणत्या राज्यात किती कांदा
In reply to कोणत्या राज्यात किती कांदा by जॉनविक्क
???
In reply to कोणत्या राज्यात किती कांदा by जॉनविक्क
वरच्या रिप्लायला निवांत विचार
In reply to कोणत्या राज्यात किती कांदा by जॉनविक्क
अवांतर : माझ्या मेळघाट ह्या
In reply to अवांतर : माझ्या मेळघाट ह्या by गणेशा
आपल्याला माझ्या व मिपापरीवाराकडून भरगोस शुभेच्छा
In reply to आपल्याला माझ्या व मिपापरीवाराकडून भरगोस शुभेच्छा by जॉनविक्क
समाधान होणे महत्वाचे, पण खरे
व्यथित करणारी रचना ! :(