Skip to main content

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

लेखक उदय सप्रे यांनी मंगळवार, 01/04/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो? तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे? हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे ! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे ! चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! पावसामुळेच तर हे सगळं शक्य आहे पाऊस माझ्या मरगळलेल्या शब्दांचा पाय आहे पंचेंद्रियांना तृप्त करतो काही क्षणांत पाऊस नसेल.....तर माझ्या जीवनात काय आहे?
लेखनविषय:

वाचने 2914
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया