मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"सहवास"

मनीषा ·
लेखनविषय:
आयुष्याच्या रखरखीत वाळवंटात एक ओऍसिस...... तुझा सहवास तु आहेस चराचरामधे तु आहेस कणाकणामधे ता-यांतून पाहतो आहेस वा-यातून जाणतो आहेस पृथ्वीवर आहे तुझीच छाया माझ्यातल्या 'मी' मधे सुध्धा... तुच आहेस अनंत काळाचा सोबती... अजुनही चालतोच आहे वादळे उठली..... शांतही झाली कितींची संगत सुटली किती नाती तुटली कोसळणा-या विश्वासाला सावरत चालताना.... झाकोळलेल्या काळोख्या रात्री वाट शोधताना... सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास

वात्रटिका

शेखर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
"मिसळपाव" खाता खाता लागली जोराची हागवण ! शौचकुप शोधायला इतिहासात धावले भक्तगण !! ================ शेखर - १८-०६-२००८

तर हे अस आहे कॉरपोरेट जग तुमच...!!!!

स्नेहश्री ·
लेखनविषय:
कधी कुणाचा कोणाला पत्ता नाही कोण कुठे हे माहित नाही आज इथे तर उद्या तिथे लाईन लागते पैसा मिळेल तिथे बोनस देत नाही टाकतो मी पेपर इंक्रिमेंट नाही घ्या माझे लेटर कोणाची कोणाला पडलेली नसते कॉरपोरेट जगात हे असेच आसते खोट रडणं नी खोट हसणं आणि त्यातच आपल आयुष्य शोधणं खोटी सहानभुती , मदत खोटी यावर चालते आपली रोजीरोटी कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची अजिबात नाही पर्वा माणुसकीची.

((बैल))

आंबोळी ·
लेखनविषय:
प्रेरणा : विजुभौंचा बैल आपण सगळेच बैल असतो कोणीतरी संस्थळ काढत असतो आणि आपण जॉईन करत असतो. जिंदादीली आणि प्रशासक नसण्यावर खुष असतो. रसिकाच्या एखाद्या इशार्‍यासरशी ऊर फ़ुटेतो लिहीत असतो आपण सगळे बैल असतो. रसिकाने यावे आपल्या लिखाणाला प्रतिसाद द्यावा त्याने आपली कविता वाचावी कधी काळी वाह वा , जबरा म्हणाव म्हणून वाट पहात असतो. आपण सगळेच बैल असतो. आपल्याला आपण विडंबवले गेलो आहोत याची काही लाज नसते. ती जाणिवच थिजलेली आसते. उत्क्रुष्ठ लेख वगैरे जाणीव कधीच निजलेली असते. आपले लेख काढून टाकले तरी आपण तसेच असतो. फ़ार तर नव्या संस्थळाच्य शोधात असतो. आणि नव्य

(बैल)

बेसनलाडू ·
आपण सगळेच बैल असतो बायको लटके रागवत असते आणि आपण घाबरत असतो फक्त दोनवेळा जेवण आणि फोमच्या डबलबेडवर खूश असतो ;) बायकोच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो. आपण सगळेच बैल असतो बायकोने यावे आपल्या गळ्यावरची दाढी खाजवावी अंघोळीला आपली पाठ चोळावी कधी तरी पुरणपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो :( आपण सगळेच बैल असतो आपल्याला आपण फसवले गेलो आहोत याची काही लाज नसते ती जाणीवच थिजलेली असते उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते बायको माहेरी गेली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या बायकोच्या शोधात असतो आणि नव्या बायकोकडे गेलो की जुनी कशी चांगली होती (?!?!?!) याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो

दिवा

आंबोळी ·
लेखनविषय:
आमची प्रेरणा स्वाती फडणीस यांची "गोडवा" आणि बेसनलाडू यांची "सोडवा" मांडी घालून तसाच ठेउ, खांदा खांदा देत राहू ! खांदेपालटाला तिरडी जरा, खाली उतरवून ठेवू !! काळ्या करड्या लाकडात, जलद आग लाऊ ! धूर ज्वाला निरखत , जीवनाचा अंत पाहू!! चल पुन्हा घराकडे , पाणी अंगावर घेऊ! गेलेल्याच्या आठवणी, दिवा माजघरी लावू !! ======================= आंबोळी.............. १८-०७-२००८

बैल

विजुभाऊ ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आपण सगळेच बैल असतो कोणीतरी फटके टाकत असतो आणि आपण पळत असतो फक्त दोनवेळा अन्न आणिउतम निवार्‍यावर खुष असतो मालकाच्या एखाद्या इशार्‍या सरशी ऊर फुटेतोवर धावत असतो. आपण सगळेच बैल असतो मालकाने यावे आपल्या गळ्याखालची पोळी खाजवावी त्यानी आपली पाठ झाकावी कधी काळी गुळपोळी चारावी म्हणुन वाटपहात असतो आपण सगळेच बैल असतो आपल्याल आपण बडवले गेलो आहोत याची काही लाज नसते ती जाणीवच थिजलेली असते उन्नत ध्येय वगैरे जाणीव कधीच निजलेली असते वेसण काढुन टाकली तरी आपण तसेच असतो फार तर नव्या मालकाच्या शोधात असतो आणि नव्या मालकाकडे गेलो की जुना कसा चांगला होता याची गाणी गात बसतो आपण सगळेच बैल असतो

तृप्ती

अमोल केळकर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमची प्रेरणा गोडवा , जोगवा आणी सोडवा ---------------------------------------------------------------------- तृप्ती . घरी पण असेच राहू, काव काव नको करु ! कामावरच टेन्शन जरा, खाली उतरवून ठेवू !! उद्याच्या करड्या दुनियेत, जलद झेप घेऊ ! नाती पैसा सांभाळत, जीवनाचे ध्येय गाठू !! चल पुन्हा एकदा, जेवण बाहेर घेऊ ! व्हेज नॉन्वेज हॉटेलात, तृप्ती शोधत राहू !! -------------------------------------------------------------------------

तृप्ती

अमोल केळकर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमची प्रेरणा गोडवा , जोगवा आणी सोडवा ---------------------------------------------------------------------- तृप्ती . घरी पण असेच राहू, काव काव नको करु ! कामावरच टेन्शन जरा, खाली उतरवून ठेवू !! उद्याच्या करड्या दुनियेत, जलद झेप घेऊ ! नाती पैसा सांभाळत, जीवनाचे ध्येय गाठू !! चल पुन्हा एकदा, जेवण बाहेर घेऊ ! व्हेज नॉन्वेज हॉटेलात, तृप्ती शोधत राहू !! -------------------------------------------------------------------------

कृतज्ञता.....गुरुपौर्णि,एनिमित्त लिहिलेला एक लेख

उदय सप्रे ·
लेखनविषय:
नमस्कार "मिपा" कर आणि मिपा चे समस्त वाचक ! तात्यांनी वर पु.ल.,पंडीत भीमसेन जोशी,कुसुमाग्रज आणि बाबूजी यांच्या फोटोसोबत गुरुपौर्णिमेची एक छान सुरुवात करून दिलीच आहे , त्याचीच जाणीव म्हणून मी मागे लिहिलेला एक लेख माझ्या हस्ताक्षरात इथे प्रसिध्द करत आहे. ही माझी तमाम समाजाला गुरु म्हणून विनम्र अशी मानवंदना आहे !