Skip to main content

सांघिक खेळ

Published on 25/07/2008 - 22:04 प्रकाशित मुखपृष्ठ
हे असे कां व्हावे? कर्मधर्मसंयोगाने विंबल्डनची अंतीम फेरी तीन ठिकाणी बसून बघितली. ज्याला त्याला फ़ेडरर जिंकावा असेच वाटत होते. नादालचे परतावे जबरदस्त दिसत असतानाही सहानुभूती त्या फ़ेडररलाच दिसत होती. तीसया सेटला नादालचा पाय दुखावला तेव्हा त्याची लंगडी चाल पाहून ’पुरे झाली तुझी नाटकं’ अशी टिपण्णी देणारे देखील होतेच. एकूण केबलचा पैसा वसूल करणारी मॆच होती हे नक्की. आणि हो, प्रेक्षकांत बसलेल्या बोर्गला हसताना पहिल्य़ांदाच पाहिले. आता सायकल शर्यत सुरु आहे. मला ही स्पर्धा जास्त शैक्षणिक वाटते. खरी संघभावना या स्पर्धकांमध्ये दिसून येते.

याद्या 3176

ठिपका

Published on 25/07/2008 - 16:29 प्रकाशित मुखपृष्ठ
घडायचे ते घडले काही टळले नाही त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही कळले नाही कसा कधी संवाद संपला वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही आज अचानक अर्थ असा हा समोर आला त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही मान्य कधीही केले नाही आपण चुकलो दोघांमधले अंतर मग हे घटले नाही बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही तू जाताना नजर तुझी माघारी वळली का माघारी पाय तुझे पण वळले नाही? बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना मला कळेना का डोळे हे मिटले नाही -अनि
लेखनविषय:

याद्या 6904

आमचे मधुभाई...!

Published on 25/07/2008 - 16:07 प्रकाशित मुखपृष्ठ
काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 19668

बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट

Published on 25/07/2008 - 15:20 प्रकाशित मुखपृष्ठ
अत्ताच बातम्यात वाचले की बेंगलोर मध्ये ७ बाँबस्फोट झाले आहेत.. आशा करतो आपले सर्व बंगलोरवासी मिपाकर सुखरुप आणि सुरक्षित आहेत.. कृपया अधिक माहिती द्यावी.. (काळजी ग्रस्त)केशवसुमार

याद्या 13962

कार्यालय

Published on 25/07/2008 - 12:39 प्रकाशित मुखपृष्ठ
कार्यालय इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय - विनोद इंगळे

याद्या 1801
Taxonomy upgrade extras

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

Published on 25/07/2008 - 11:32 प्रकाशित मुखपृष्ठ
नांव "सागर" ,पण खरंच सागरा सारखा विशाल होता. मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता. आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला. म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो त्याला एव्हडा आवडला होता का?.मग ह्या नावडत्या दुनियेत त्याला त्याने मुळात पाठवलंच कशाला?.कां त्याच्या आईला अगोदरच कमी का दुःखं होती?. बिच्याऱ्याचे वडील तो खूपच लहान असताना त्याला सोडून गेले.एक त्याला धाकटी बहिण मागे ठेवून गेले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1736

जराशी खिडकी उघडा राव..!

Published on 25/07/2008 - 10:43 प्रकाशित मुखपृष्ठ
पाऊस कधीचा साद घालतोय, जराशी खिडकी उघडा राव..! आले तर येऊ देत दोन थेंब आत तेवढाच जरा भिजायला वाव..! भिजला तर भिजू दे कोट, उद्या पुन्हा वाळेल ना..! पण आजचा असाच पाऊस उद्या पुन्हा मिळेल का ? आम्ही आपले देतोय म्हणून खाऊ नका इतका भाव..! पाऊस कधीचा साद घालतोय, थोडीशीच खिडकी उघडा राव..! तुम्हाला आपली एकच काळजी बिघडेल आपली कडक इस्त्री. पण कधी शोधून पहा ना धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..! एटीकेट आणि फ़ॉर्मॅलिटीजची नकोच तुमची डराव डराव..! पाऊस कधीचा साद घालतोय, जरा तरी खिडकी उघडा राव..! एसी मध्ये बसून बसून जीव अगदी शीणला आहे. बघू आकाशाने कसा इंद्रधनू विणला आहे. खरं सौंदर्य पाहू आता स्क्
लेखनविषय:

याद्या 4338
Taxonomy upgrade extras

'वाघ्या'

Published on 25/07/2008 - 00:03 प्रकाशित मुखपृष्ठ
वाघ्या नावातच कस दमदार व्यक्तिमत्व झळकत ना. अहो .....होताही तो तसाच दमदार, भरभक्कम , निधड्या छातीचा. तो दिसला की कोणाची बिशाद नव्हती त्याच्यासमोरुन चालण्याची. नावाप्रमाणेच अंगावर वघासारखे कातडे, झुबकेदार शेपुट, तिक्ष्ण नजर अन भुंकला तरी वाघाने डरकाळी फोडावी तसा आवाज. हो असाच होता आमचा इमानी कुत्रा 'वाघ्या'. वाघ्या ची आमच्या घरात entry तशी मजेशीरच झाली. माझ्या बाबांना प्राण्याविष्ई खुप प्रेम, खास करुन कुत्रा अन मांजर अगदी उंदीर सुध्दा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1874