मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

.....बळ दे !

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
.....बळ दे ! दोन हांत जोडून माझं एकंच मागणं देवा , दु:ख दूर करु नकोस , पण ते सोसायचं बळ दे ! कोण तसा जीवनांत सुखासीन असतो? स्वदु:खात आणि परसुखात हसायचं बळ दे ! जीवनाच्या जुगारांत हार्-जीत असणारच , एकदा तरी "सुंदर" शी खेळी "फसायचं" बळ दे ! दिवसा ढवळ्या भले कितीही पापं लपू देत , अंधारातही स्वतःच्या चुका दिसायचं बळ दे ! कुणीतरी जीव लावेलंच ना या वेड्याला? थकून कधी ते अश्रू ढाळील , तर ते पुसायचं बळ दे ! स्वप्नं ऊरी कवटाळून रमी खेळत रहाणारा मी , सरते "शेवटी" "प्लस्" व्हावं , इतकं पिसायचं बळ दे ! स्वप्नंपूर्तीनंतर फारसं जगावंसं वाटत नाही , पण..... राहिलोच तसा , तर्.....सर्वांत असूनही नसायचं बळ दे !

वाचन 1755 प्रतिक्रिया 0