मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सदस्य नाम कसे बदलावे?

सरपंच · · पुस्तक पान
नवीन असतांना एवढं मराठी पाहून बिचकलो.मराठी लिहीता येते की अशी शंका होती. म्हणून सदस्य नाम इंग्रजीत लिहीले. मराठी लिहीले पण ते भलतंच लिहील्या गेलंय. आता ते बदलावं म्हणतो. अश्या अनेक प्रश्नांवर सदस्य नाम बदलने हा एक उपाय आहे. १) यासाठी प्रवेश केल्यानंतर डाव्या समासात माझे खाते वर टिचकी मारा. २)त्यानंतर आपल्या सदस्यनामाच्या खाली संपादन वर टिचकी द्या. ३)तेथे खाते सुचना च्या चौकटीत सदस्यनाम नावाची छोटी चौकट आहे. येथे तुम्हाला हवे ते नवीन नाव द्या. ४)पानावर सर्वात खाली जाऊन प्रकाशित करा वर टिचकी द्या व बदल साठवा. संपादन मधे गेलाच आहात तर वैयक्तिक माहिती व्यावसायिक माहिती आदींवर टिचकी देऊन तुमचे व्यक्तीचित्र (प्रोफाईल) पुर्ण करा. धन्यवाद.

वाचन 8996 प्रतिक्रिया 0