Skip to main content

"जसा व्याप तसा संताप!"

Published on 08/08/2008 - 22:24 प्रकाशित मुखपृष्ठ
"हे तिचं संभाषण ऐकून मी थक्कच झालो.मनात म्हणालो, "आपण प्रकृती बद्दल इतका गंभीर विचार कधीच केला नाही. Anorexia चा कधी विचारच आला नाही.कुणीसं म्हटलंय, "जसा व्याप तसा संताप!" हेच खरं" रघूवीर देशपांडे आमचे जुने शेजारी.त्यांच्या मुली आता मोठया झाल्या.त्यात त्यांची मोठी मुलगी,अंजना म्हणजेच आता सौ.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1550

हे मि.पा. वर काय चालले आहे?

Published on 08/08/2008 - 22:11 प्रकाशित मुखपृष्ठ
सध्या मि.पा. संकेतस्थळा चे भारताच्या लोकसभेमध्ये रुपांतर झाल्याचा भास मला क्षणभर झाला. खरे तर मि.पा. ला निखळ आनंद देणारे संकेतस्थळ म्हणुन माझ्यासारखे हजारो, लाखो वाचक भेट देत असतात पण मागील काही दिवसां पासुन कोणत्या हि लेखाच्या प्रतिक्रियांमध्ये जी काही चिखल फेक होते आहे ति बघुन असे वाटते काहि तरी चांगले मनोरंजक, आभ्यास पुर्ण लेख लिहण्याची ताकत आपण नाहक वाया घालवत आहोत. मि मि.पा. च्या एकाहि सदस्याला व्यक्तिगतरीत्या ओळखत नाही याची कृपया नोंद घ्यावी. आणि मि.पा. मध्ये चाललेल्या अंतरगत राजकारणामध्ये हि मला काडीमात्र रस नाहि. मला फक्त येवधेच सांगावे वाटते कि मि.पा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9975

"किती धटिंगण किती भयंकर"... ई डंबन...

Published on 08/08/2008 - 19:31 प्रकाशित मुखपृष्ठ
संदीप खरेच्या "कितीक हळवे कितीक सुंदर" ही कविता वाचुन आम्हालाही आमचे सोकॉल्ड हळवे क्षण आठवले... किती धटिंगण किती भयंकर ----------------------------------------- किती धटिंगण किती भयंकर तात तुझे अन बंधु खरोखर त्याच जागी त्या येऊन गेले फाडुनि माझे चड्डी धोतर
लेखनविषय:

याद्या 1919

`रामदास'बोध

Published on 08/08/2008 - 17:22 प्रकाशित मुखपृष्ठ
सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते. समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते. बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता. सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या. महाराजांची रसवंती झरझर पाझरत होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1822

०८:०८:०८:०८:०८:०८

Published on 08/08/2008 - 17:06 प्रकाशित मुखपृष्ठ
तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे व सेकंद या सगळ्या जागी ०८ हाच आकडा असलेला एक क्षण नुकताच येऊन गेला. असा क्षण पुन्हा शंभर वर्षांनंतर २१०८या साली येईल. तो क्षण पहायला त्या वेळी आपल्यातले कोणी असणार नाही. या वर्षी फक्त एक सेकंद उशीराने जन्मलेल्या मुलाला सुद्धा तो क्षण पाहण्यासाठी शतायुषी व्हावे लागेल. पण ०१, ०२ वगैरे आंकडे सहा जागी असलेले अशासारखे क्षण गेल्या आठ वर्षांपासून दर वर्षी येत आहेत आणि पुढील चार वर्षे म्हणजे १२ डिसेंबर २०१२ पर्यंत येत राहतील.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3761

(सांगा ढेकुण कुणी हा पाहिला )

Published on 08/08/2008 - 17:03 प्रकाशित मुखपृष्ठ
---------------------- सांगा ढेकुण कुणी हा पाहिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला झोपुनिया असता खाटवरी हो, तसे होतो आम्ही गहनविचारी डंखुनी गेला तो विषधारी कुठे लपुन बाई हा राहिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला रात्री जागविती, हे ढेकुणजन हे सुयोग आम्हालागी तुझा ना साहे बळेबळे ओढता चादर हो मालवुनि बघा दिवा खोल्यांचा डंख पदी झाला मेल्याचा म्हणे अमल्याजी, देह हा फोडिला सांगा ढेकुण कुणी हा पाहिला ------------------------------------------------------------------------------------------------------------ मुळ गाणे - सांगा मुकुंद कुणि हा पाहिला सांगा मुकुंद कुणि हा पाहिला रासक्रीडा करिता
लेखनविषय:

याद्या 3874

एका तळ्यात होती बदके पिले अनेक...

Published on 08/08/2008 - 14:36 प्रकाशित मुखपृष्ठ
एका तळयात होती बदके पिले अनेक.... मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक... संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'... होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख... सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक... पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख... कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक... जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक... सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक... आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक... सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक... त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक.... ( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)
लेखनविषय:

याद्या 3123
Taxonomy upgrade extras

झटपट घावन

Published on 08/08/2008 - 13:32 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ. कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे. तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते. टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.

याद्या 5129

वृत्ती-प्रवृत्ती..

Published on 08/08/2008 - 11:46 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रसंग पहिला औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली. वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5176