Skip to main content

एक शृंगारीक कविता

लेखक रामदास यांनी सोमवार, 15/09/2008 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भिरभिरते अशी नजर कशाला का, पदर चाचपून बघते ग. भाळावरचे थेंब टिपूनी का ,उगाच खुद्कन हसते ग. एकांतामधी चावेचिमटे कोण तपासून बघते ग दाताखाली ओठ चावूनी कोण उसासून थकते ग. झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी कुठे सांडली बुगडी ग दहीवर आले उंबरठ्याशी रात्र तोकडी पडली ग बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग.
Taxonomy upgrade extras

दुर्गा झाली गौरी!

लेखक विकास यांनी सोमवार, 15/09/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे. भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते.

बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 15/09/2008 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली. गाडी फुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले. तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला. मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा. म्हटलं, "मग सोडा युपी दिन, 'जय महाराष्ट्र' म्हणा..!" -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

आकाश-जमीन

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 15/09/2008 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याचं त्याचं आकाश असतं ज्याच्या त्याच्या माथ्यावर. आकाश... निळंभोर गुलाबी,जांभळ्या, नारिंगी, पिवळ्या रंगानी रंगतं. भुलवत....खुणावतं कवेत आलसं वाटतं, कित्तेकदा पण कवटाळायला जावं तर , दूर्...दूर जातं परस्थ होऊन राहतं त्याला स्पर्श करण्यासाठी उडया माराव्या उंच...उंच... ते अधिकच उंचावतं खिजवतं वाकुल्या दाखवतं त्या प्रत्तेक क्षणी पायतळीची मातकट जमीन मात्र पायाला बिलगून असते. बेछूट, बेताल पावलांना आधार देते. सावरुन धरते ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते. ज्याची त्याची जमीन एक वास्तव.
Taxonomy upgrade extras

रूपक

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 15/09/2008 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच .

तुझे भुल जाना जाना...

लेखक फटू यांनी सोमवार, 15/09/2008 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारची संध्याकाळ संपण्याच्या बेतात होती. पण संधीप्रकाशाचा कुठेही मागमुस नव्हता. अगदी लख्ख उजेड होता. इकडे कॅलिफोर्नियामध्ये रात्रीचे नऊ वाजले तरीही उजेड असतो. आपल्याकडे असं नसतं ना. सहा साडे सहा झाले की अंधार पडायला सुरुवात होते. आणि सात वाजता तर अंधार होऊनच जातो. आपल्याकडेही जर इकडच्या प्रमाणे रात्री आठ वाजता दिवस मावळतीला जाऊ लागला तर... अरमानचं आताच साहीलशी जिमेलवर बोलुन झालं होतं. साहील त्याचा ओरकुटवरचा मित्र. कुठूनतरी "फ़्रेंड ऑफ फ़्रेंड" असं करत त्या दोघांची मैत्री जुळली होती. अर्थात आभासीच. इंग्रजीत सांगायचं तर व्हर्चुअल. जिमेलवर बोलताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.