संवेदना
'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?'
'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय.
मिसळपाव
उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो.
गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.