(सदैव माणसा, पुढेच जायचे )
सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे
सदा तुझ्यापुढे, असे महा दशा
सदैव फसवी टॅरोट्ची दिशा
हळूच ग्रह हे,राशीस ग्रासती
मधेच या नाडी, निर्गाठ मारती
बारा जागेतुनी, हळूच जायचे
प्रलोभने तुला हे स्वामी दाविती
ही जन्मकुंडली तूलाच बाधिती,
मंगळ, शनी हा तुला न थांबवी
न चंद्र ग्रहणे, आयुष्य घडवी
न भविष्य तुझे, असे घडायचे
सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे
( 'भविष्याच्या अंतरंगात' डोकावणारा ) अमोल
---------------------------------------------------------
मुळ गाणे -
सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे
नाडी भविष्य - एक चिकित्सा
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ?
नाशिक येथे महापुर
नमस्कार मिपाकर....
आज सकाळी मिपावर काथ्याकुट मधे विकास यांचा "पाणीच पाणी चहुकडे" हा लेख वाचला.
त्यानंतर ई-सकाळवर नजर फिरवताना या संदर्भात आणखी माहिती मिळाली.
या संदर्भातील आणखी माहिती आणि छायाचित्रे इथे टाकत आहे.
(स्त्रोत - ई-सकाळ)
मिपाच्या नियमांमधे हे बसत नसेल तर हा लेख उडवावा ही तात्यांना नम्र विनंती.
सविस्तर माहिती -
http://www.esakal.com/esakal/09202008/SpecialnewsEDDB762911.htm
पुरपरिस्थिची छायाचित्रे -
दिल्लीमधे दोन दहशदवाद्यांना कंठस्नान
आजच्या म.टा. मध्ये ही बातमी वाचली. ह्या एनकाऊंटर बद्दल दिल्ली पोलिसांचे कौतूक केले पाहिजे वगैरे ठीक आहे, परंतु इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्माला शहीद मानने कितपत ठिक आहे? ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा? दहशदवाद्यांचा नक्कीच नाही! बातमीत म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांकडून ८ गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या तीन गोळ्या इं. शर्मांना लागल्या.
दुसरी बाब म्हणजे, जो अतिरेकी पोलिसांच्या हातात जिवंत सापडला, तो योगायोगाने आजमगड जिल्ह्यातील समाजवादी पार्टीच्या उपाध्यक्षाचा मुलगा आहे!
म्हणी रिमिक्स! :)
हॅलो सगळे मिपाकर !
अभिजितचा म्हणींचा धागा भलताच लोकप्रिय ठरला .. त्यावरून हा खेळ आठवला.. एका संस्थळावर पाहीला होता..
या खेळात, दोन वेगळ्या म्हणी एकत्र करायच्या आहेत.. :)
उदा...
हातच्या कंकणाला खळखळाट फार.. ! :)
असेल हरी तर जमतील भुते..! :)
चला, येऊद्या अजुन विनोदी म्हणी! :)
पाऊस - बालगीत
मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी...
सर सर सर वारा सुटला
काळ्या ढगांना घेऊन आला||
रिमझिम रिमझिम पाऊस आला
इंद्रधनुष्य खुलवू लागला ||
वीज कडाडली कड कड कड
थेंबे बरसली टप टप टप||
झाडे वेली फुलपाखरे
आनंदली पशु पाखरे ||
धरतीचा हा सुगंध आला
आसमंती दरवळू लागला ||
धरती माता आनंदली
खुदू खुदू हसू लागली ||
--कु. प्राजक्ता वांजरखेडकर, अंबाजोगाई, इयत्ता ६वी
Taxonomy upgrade extras
प्राजुच्या कल्पनेचा विस्तार !
कवितेची पार्श्वभूमी:
काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी --
हृदयात सागराच्या फेसाळती लाटा
प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !"
नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला.
Taxonomy upgrade extras
पाणीच पाणी चोहीकडे...
आत्ताच म.टा. आणि सकाळ मधे वाचले त्याप्रमाणे नाशिकमध्ये महापूर आला आहे आणि पुण्यासकट महाराष्ट्रात इतरत्रही पावसाच्या पाण्याने पूरसदृश्य परीस्थिती झाली आहे...
काही ठळक माहीती (वास्तवीक सगळेच ठळक आहे पण...)अशी:
- पुराच्या पाण्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या प्रसिद्ध नारोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाली आहे.
ऋषी आणि लांडगा... :)
राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
कृपया हे वाचा!
वरील दुव्यातली कथा वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार येथे नोंदवत आहे. आपल्याही मनातले विचार इथे नोंदवून हा धागा अंमळ मजेशीर करा ही विनंती.. :)
माझ्या मनातले विचार -
१) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे. "माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही.." हेच त्या ऋषीला, सॉरी! गोसावड्याला भासवायचं असावं! :)
२) जर ही ष्टोरी खरी असेल तर त्या ष्टोरीत लांडग्याच्या ऐवजी एखादा जबरदस्त भुकेला पट्टेरी वाघ असता तर किती बरं झालं असतं!
मिसळपाव