बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)
लेखनविषय:
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी,
क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून,
राजभैय्याची माणसं परवा गेली स्टॉलवर येऊन.
गणपतीच्या मिरवणुकीसारखी चार भिंतीत नाचली.
मोकळ्या हाती जातील कशी, घरची मात्र वाचली.
गाडी फुटली, चूल विझली, होत्याचे नव्हते झाले.
तिकिटासाठी म्हणून थोडे पैसे बाकी ठेवले.
कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे.
उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला.
पैसे नकोत पण थोडा एकटेपणा वाटला.
मोडुन पडलाय संसार आणखी मोडू नका कणा.
म्हटलं, "मग सोडा युपी दिन, 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"
-- अभिजीत दाते
वाचने
2583
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चेपा साल्यांना...
भावना पोचल्या.
लढ बापू
वा! लै भारी
झकास !!!
कणा