Skip to main content

बाकरवडी

लेखक वल्लरी यांनी शनिवार, 04/10/2008 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- बाकरवडी मसाला साठी:- १ कप सुके खोबरे १/२ कप शेन्गदाणे ३ चम्चे तीळ १/२ चम्चा हळ्द १ चम्चा लाल तिखट १ चम्चा जिरे २ चम्चे गरम मसाला १ चम्चा धणे + जिरे पावडर १ चम्चा आले लसुण पेस्ट १/२ कप चिन्चचे दाट पाणी १ चम्चा साखर १/२ कप बारिक शेव बारीक चिरलेली कोथीम्बीर चवीपुर्ते मीठ बाकरवडी कवर साठी:- २ कप मैदा १/२ चम्चा जिरे बेकिन्ग सोडा १ चम्चा तेल चिमुटभर हळ्द + लाल तिखट चवीपुर्ते मीठ कृती:- १.एका बाऊल मध्ये मैदा+जिरे+बेकिन्ग सोडा+चिमुटभर हळ्द + लाल तिखट आणि तेल कडक्डीत गरम करुन चान्गले मिक्स करावे आणि कोमटपाण्यात पीठ छान मळुन घेणे २.

मिपाच्या सदस्यांच्या पानावरची माहिती.

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 04/10/2008 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल असाच अडलटप्पू ( रॅन्डम) विचार मनात आला की मिपाच्या आपल्या सदस्य मित्रांच्या पानावर जाऊन त्यांची माहिती मिळवायची. मृदुला : तिच्या वैयक्तिक पानावर गेलो. तिची माहिती देण्याची पध्दत आवडली. अनुदिनीवरचा लेख आवडला. त्यावरील राजचे विचार आणि अनुची अनुदिनीही आवडली. सखाराम_गटणे™ : माहिती आवडली. घाटावरचे भट, जैनाचं कार्ट, ग्रीष्म, आगाऊ कार्टा, बिपिन कार्यकर्ते : त्रोटक माहिती आहे. अजून देता येईल श्रीकृष्ण सामंत : फक्त व्यावसासिक माहिती आहे. येडा खवीस : माहिती आहे. संकेतस्थळावर गेलो पण समजले नाही. ऋषिकेश : त्रोटक माहिती. १_६ विक्षिप्त अदिती : माहिती वेगळ्या आणि विनोदी पद्धतीने दिलेली आहे.

बाकडं...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 04/10/2008 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभेत `नोट फॊर व्होट' प्रकरण झालं, तेव्हापासून `बाकडं' माझं डोकं पोखरतंय... म्हणजे, प्रत्येक माणसाचा एकएक स्वभाव असतो. पण, तो त्याचा मूळचा स्वभाव नसतो. तो कुठे बसतो, त्यावर त्याचा स्वभाव अवलंबून असतो, असं त्या दिवशीपासून माझं ठाम मत झालंय. कारण, त्या प्रकरणानंतरचा लालकृष्ण अडवाणींचा चेहेरा मला आजही जसाच्या तसा आठवतोय. बाकड्याचा परिणाम.

"जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 03/10/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे ख

श्राद्ध

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 03/10/2008 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वपित्री अमावस्येच्या निमित्ताने पुनर्प्रकाशित. श्राद्ध
मी माझ्या आईचे श्राद्ध दरवर्षी घालतो, ती जीवंत असताना ,तीला कधी, प्रेमाने साडी आणली नाही... पण तिच्या पिंडावर रेशमी धागा मात्र, दरवर्षि घालतो....... ती जीवंत असताना, तिला कधी, प्रेमान जेवु घातले नाही, पण तिच्या पिंडाला पक्वानांचा नेवैद्य मात्र दरवर्षि दाखवतो.... ती आजारी होती..

पितृ पंधरवडा!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 03/10/2008 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
"दहा जनपथ'च्या बाहेर पितृपक्ष बराच वेळ खेपा मारत होता. त्याला आत प्रवेश मिळत नव्हता. "भल्याची दुनिया राहिली नाही,' असंच त्याला वाटत होतं. पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड करणाऱ्यांना इथे झटपट आणि बराच वेळ भेट मिळते आणि दस्तुरखुद्द राज्याच्या कारभाऱ्यांना भेटीसाठी दोन-तीन दिवस ताटकळावं लागतं, हे त्यानं ऐकलं होतं. मात्र, हल्ली ते दिवसही सरल्याचंही कुठूनतरी कानावर आलं होतं. त्यामुळं मोठ्या आशेनं तो मॅडमच्या भेटीसाठी आला होता. वर्षानुवर्षं नाहक बदनामी झाल्यानं बिचारा आधीच जाम वैतागला होता. एकतर त्याच्या कारकिर्दीत काही शुभ घडत नसे आणि आणि यदाकदाचित काही अशुभ झालं, की त्याच्याच डोक्‍यावर खापर फुटत होतं.

माझा अनुभव

लेखक आगाऊ कार्टा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या जीवनातील एक अनुभव लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. चु.भु.दे.घे. हा प्रसंग म्हणजे माझ्या अनेक नसत्या उचापतींपैकी एक आहे. मे महिन्याचे दिवस होते. बारावीची परीक्षा नुकतीच संपली होती. दिवसभर नुसते उंडराणे, कैर्‍या, चिंचा धोंडे मारुन पाडून खाणे आणि गावभर गजाली करत हिंडणे याशिवाय दुसरा उद्योग नव्हता. अशातच एक दिवस बातमी समजली की आमच्या गावाजवळच्या जंगलात एक वाघ आला आहे. माझा भाऊ (अभिनव) सुद्धा तेव्हा आमच्याकडे आला होता. मला ही बातमी समजल्यावर मी अभिनवला म्हटले की आपण वाघ बघायला रात्री जाऊया..... पण यात एक मोठा "पण" होता.

दिवस आजचा

लेखक शुभदा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अंथरुणात असताना हलकेच सूर्याची तीरीप डोळ्यावर आली, मन आणि शरीर दोघांना खूप छान वाटले. जसे रात्री झोपताना चंद्राचा शीतल प्रकाश आणि वार्‍याची हलकी झुळुक छान झोप देऊन जाते तसेच अशी प्रसन्न सकाळ चांगल्या दिवसाची भेट देऊन जाते. श्रावणातला उन, पावसाचा खेळ चालू होता. मी उठणार तेवढ्यात आवाज कुठून आवाज आला. चक्क सूर्य देव माझ्याशी बोलत होते. "थांब माझीच दमछाक झाली आहे. रोज सगळ्याना वेगवेगळ्या रूपात भेटताना. पण, मला रोज तेजोमय तळपण्यासाठी कुठून ताकद आणतो मी. माझ्या अस्तित्वासाठी रोजचा रोज तळपतो मी" .

सोप्पी शेवेची भाजी

लेखक शिप्रा यांनी शुक्रवार, 03/10/2008 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः जाड शेव, कांदे, दालचिनी, लवंगा, खसखस, जिरे, धने, आले लसुण पेस्ट, सुक्या खोबर्‍याचा किस, लाल तिखट, मीठ, पाणी व फोडणीचे साहित्य. शेव सोडुन सर्व साहित्य एकत्र वाटा... नंतर तेलाची फोडणी करुन त्यावर वरिल वाटण परतुन घेणे..खमंग वास आला की त्यात जेवधी पातळ भाजी हवी असेल तेवधे पाणी घाला...चांगले उकळवा...जेवायच्या आधि थोडा वेळ वरिल आमटित शेव घाला..वरुन लिंबुरस घाला व गरम गरम भाजी, पोळी किंवा फुलक्यावर ताव मारा...

यासुकुनी श्राईन

लेखक सहज यांनी शुक्रवार, 03/10/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्ष यासुकुनी श्राईन[समाधी/स्मारक??] हे नाव बातम्यात अधुनमधुन कानावर यायचे, की चीन सरकारने [द. कोरीया, उ. कोरीया देखील] जपानी पंतप्रधान यांनी यासुकुनी श्राईनला भेट दिली म्हणुन कडकडीत निषेध नोंदवला. तेव्हापासुन मला हा यासुकुनी स्मारक नक्की काय प्रकार आहे हे जाणुन घ्यायचे होते. काही मित्रांकडून तसेच आंतरजालावर माहीती मिळाली. त्यात हा दुवा विशेष उल्लेखनीय.