छायाचित्र - काचेच्या विविध वस्तु.
राम-राम मंडळी, मिपावर जेव्हा एकापेक्षा एक सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना आपण वाचतो तेव्हा, एखाद्याकडे अलौकिक प्रतिभा असते म्हणजे काय असते त्याचा साक्षात्कार होतो. कवीला एखादी कल्पना सुचते कशी ? याबाबत कायमच कुतूहल असते. दैनंदिन जीवनव्यवहारात तुम्ही आम्ही जे शब्द वापरतो तेच शब्द वापरुन एखाद्याला कवितेसाठी नेमके शब्द सुचतात. ती कविता एक वेगळा अनुभव आणि आनंद देते.