एक वादळ ..
Taxonomy upgrade extras
एक वादळ..
एक वादळ..थोडंसं अंधारात पडलेलं
माहीत नाही कुणाला पण प्रत्येकात दडलेलं..
उठ शोध घे, तुझ्यामधल्या वादळाचा..
विसरून जा सारं मनाविरूद्ध घडलेलं..
अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास
कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं..
अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे
नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं
निर्झर हो वाहून जा, झर-झर सारं पाहून जा
खुळ्या हळव्या डोळ्यातून, कुठे पाणी होतोस अडलेलं..
आनंदा
वाचने
2984
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
सुंदर!
In reply to सुंदर! by स्वाती फडणीस
हेच आवडले
सुरेख कविता...
आनंद
फारच सुरेख
अश्रूंपास
सुंदर कविता..
In reply to सुंदर कविता.. by llपुण्याचे पेशवेll
हेच म्हणते..