होय म्हाराज्या!
लेखनप्रकार
कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्याकडून (भटजीकडून) गार्हाणं
घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते.
ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गार्हाणं घातलं,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडं या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना
यश,समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.
बाप्पा मोर्याला गार्हाणं ......
हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर-पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.
"होय म्हाराज्या"
हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.
"होय म्हाराज्या"
हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.
"होय म्हाराज्या"
हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.
"होय म्हाराज्या"
हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे,असा तुका आमचा सांगणा.
"होय म्हाराज्या"
शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्याक, क्षमा कर.
"होय म्हाराज्या"
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.
"होय म्हाराज्या"
गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.
श्रीकृष्ण सामंत
वाचने
3499
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान
आभार
छान!
In reply to छान! by पिवळा डांबिस
सगळे देव सामके
In reply to सगळे देव सामके by श्रीकृष्ण सामंत
संस्कृत सगळ्याना कळतं का?
सामंतानु आता मिपासाटी पन एक गार्हानं घालाच!
देवा