Skip to main content

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.

शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच

लेखक टारझन यांनी शनिवार, 18/10/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच
ओमार दादा मिश्ते शेंच्युरी मारो ( कृ भावना को समझो ) .... ९४ रन नाबाद .. शेन वॉटसन चा एक अखुड टप्प्याचा चेंडू .. तो खाली वाकला , पण अपेक्षे प्रमाणे चेंडू उसळलाच नाही ,, चेंडू अगदी बॅट जवळनं गेला .. आमचं अँड्रिनलीन पुन्हा वाढलं ... बराच वेळ गेला (मी तो पर्यंत जरा बाहेरची हवा खाऊन आलो) .. परत आलो तेंव्हा त्याने सोळाव्या कसोटी शतकानंदर माझ्या कडे बॅट दाखवून मला अभिवादन केलं .. मी फारच खुष झालो ... आनंद गगनात मावेना ...

निरोप......

लेखक sanjubaba यांनी शनिवार, 18/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप...... राहिली न शाश्वती आता कुणाला कुणाची..... कशास मग काळजी करावी जीवाची...... जीवनाच्या वाटा अशा काटेरी झाल्या.... आशा मनीच्या मनातच निमाल्या...... साव ली ही आता वाटे रणरणत्या उन्हा ची कशास मग काळजी करावी जीवाची......... शब्द ही न येती भेटीस आता.... खातो किती म्हणती हा जगाच्या ला ता....... आधीच प्रेत यात्रा निघाली आत्म्या ची...... कशास मग काळजी करावी जीवाची....... अखेर चा निरोप घेईन मी म्हणतो उसन्या आवाजाने मी गुणगुणतो.... न लाज राहिली मज आता जनाची...... कशास मग काळजी करावी जीवाची.......
Taxonomy upgrade extras

बातमी

लेखक mina यांनी शनिवार, 18/10/2008 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
जालना तालुक्‍यात २३० कुपोषित बालके -१७ Oct९ber २००८ जालना- जिल्ह्यात श्रेणी तीन व चारमधील कुपोषित बालकांची संख्या सर्वांत जास्त २३० एवढी आहे. त्यातही जालना तालुक्‍यात कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव भेले यांनी दिली. गुरुवारी (ता. १६) येथील (कै.) शंकरलाल मुंदडा मतिमंद बालगृहातील कुपोषित बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यात श्रेणी तीनची- २०८ आणि श्रेणी चारची-२२ कुपोषित मुले आहेत.

निघून गेली रात्रपरी

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 18/10/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्ताच्या बुंध्यापाशी पाउस पाडून शुभ्रकेशरी सुगंध सांडून अशीकशी निघून गेली रात्रपरी दवबिंदूंची नक्षी रेखुनी तरुलतेच्या शालूवरी दहीवराने तृणा माखुनी निघून गेली रात्रपरी उषाराणीच्या कोमल गाली सोडून गेली रंग जरतरी कांचनात मिसळून लाली निघून गेली रात्रपरी मदनाक्षीची नीज जपोनी कुंतलास ती विखरी मिलनाची कसक ठेवूनी निघून गेली रात्रपरी चांदणे शिंपीत गेली रात्रभर गगनात जरी करुन उषेला मंत्रखुळी निघून गेली रात्रपरी

रवींद्र पिंगे यांना श्रध्दांजली

लेखक mina यांनी शनिवार, 18/10/2008 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे याच्या निधनाने साहित्यविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. 'प्राजक्ताची फांदी','मोकळ आकाश','मुंबईचं फुलपाखरु','आनंदपर्व्','आनंदाच्या दाही दिशा'देवाघरचा पाऊस' असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. प्रख्यात ललित लेखक रवींद्र पिंगे यांना माझी आदरांजली.

जरा `वजन' ठेवा!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 18/10/2008 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
सदू आणि दादू जानी दोस्त. कळायला लागलं, तेव्हापासून एका ग्लासातले. गावातले लोक तर त्यांना ढवळ्या-पवळ्याच म्हणायचे. सदू सातवीपर्यंत शिकला होता, तर दादूनं पहिलीनंतर शाळेचं तोंड पाहिलं नव्हतं, एवढाच काय तो दोघांमधला फरक. सदू ग्रामपंचायतीत चिकटला, तर दादू मोलमजुरी करून रात्रीच्या दारूची सोय बघू लागला. घरदार वगैरे काही प्रश्न नव्हता; कारण दारूवर पैसे उडवल्यानंतर हाताशी फार काही राहत नव्हतं. सदूची नोकरी बऱ्यापैकी चालली होती. तो आणि त्याच्या चार भिंती, एवढाच संसार. खरं तर चार भिंतीसुद्धा नाहीत. एक ढासळलीच होती. पुढच्या पावसाळ्यात राहील की नाही, याची खात्री नव्हती.

उत्तम सर्व्हर कोणता?

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 18/10/2008 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गेले काही दिवस मिपा वारंवार बंद पडत आहे. काल रात्रीही ते बराच वेळ बंदच होते. नीलकांतला विचारले असता तो त्याचे कारण मिपाचा सर्व्हर बरोबर नाही असे सांगतो.. गेले काही दिवसांपासून तोदेखील अगदी खूप प्रयत्न करत आहे परंतु मिपाचे बंद पडणे सुरूच आहे.. सबब, या चर्चापस्तावाद्वारे मी असे विचारू इच्छितो की सर्वात उत्तम सर्व्हर कोणता? त्याला किती पैसे पडतात? कुठल्या कंपनीचा घ्यावा जो मिपाच्या सध्याच्या सर्व्हरसारखा वारंवार बंद पडणार नाही! मला या सगळ्याबद्दलची काहीच तांत्रिक माहिती नाही. कुणी सांगू शकेल काय? तात्या.

जेट नावाचा हिमनग

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 17/10/2008 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
जेटची कर्मचारी कपात हा सध्या ज्वलंत विषय झाला आहे. अगदी सनसनाटी. जेट - किंगफिशर एकीकरण प्रस्तावापेक्षाही गाजलेला विषय. जेटने माणसे काढली. गाजावाजा झाला. माणसे परत घेतली. संपले. पण हे इतके वरवरचे आणि सहज नाही. मल्ल्या- गोयल भेट. व्यायसायिक साहचर्याची चर्चा. लगोलग जेटने कामगार कपात केली. काही तासातच माध्यमांना माहिती मिळाली. अल्पावधीतच बहुसंख्य नोकरी गेलेले अमराठी असतानाही राज ठाकरे यांना साकडे घालतात; मुळात त्यांना राजचा ठावठिकाणा लगेच मिळतो. ते आपल्या संघटनेला जाब न विचारता थेट मनसे कार्यालय गाठतात. एकुण बरेचसे न पटण्यासारखे दिसत आहे.