शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच
शेवटी त्याने स्वतःला सिद्ध केलंच
ओमार दादा मिश्ते शेंच्युरी मारो ( कृ भावना को समझो ) ....
९४ रन नाबाद .. शेन वॉटसन चा एक अखुड टप्प्याचा चेंडू .. तो खाली वाकला , पण अपेक्षे प्रमाणे चेंडू उसळलाच नाही ,, चेंडू अगदी बॅट जवळनं गेला .. आमचं अँड्रिनलीन पुन्हा वाढलं ... बराच वेळ गेला (मी तो पर्यंत जरा बाहेरची हवा खाऊन आलो) .. परत आलो तेंव्हा त्याने सोळाव्या कसोटी शतकानंदर माझ्या कडे बॅट दाखवून मला अभिवादन केलं .. मी फारच खुष झालो ... आनंद गगनात मावेना ... म्हंटल वा रे पठ्ठ्या शेवटी जाताना एक जबरदस्त खेळी केलीस ... आम्ही भरून पावलो ..
मित्रांनो ह्या शतकाला त्याच्या बाकी १५ शतकी खेळांपेक्षा नक्कीच जास्त महत्व आहे ..कारण यावेळी तो निवृत्त होणार आहे .. ही त्याची शेवटची खेळी आहे .. नर्व्हस नाइंटिजच टेंशन काय असतं ते तुमच्या पैकी बर्याच जणांनी अनुभवलं नसेल. मी ज्यावेळी गल्ली क्रिकेटपटू होतो (मी आता गल्ली क्रिकेट मधून व्ही.आर.एस. घेतला आहे) , मला नऊ रनांवर असताना नव्हस नाइन(टी)च जाम टेंशन येत असे .. नऊ धावांवर मी नव्वद वेळा बाद झालोय .. कचितच मी १० रन केले की गॅलरीत मॅच (की मला ? आपले गोड गैरसमज हो ) बघत असलेल्या रुपाली कडे लॉर्डस वर शतक केल्याच्या रुबाबात बॅट दाखवत असे. असो .. क्रिकेट कमी ग्लॅमर जास्त हा भारतिय क्रिकेटचा अनुभव आम्ही गल्ली पासनं अनुभवतोय.... तर सांगायचा मुद्दा असा ... आमच्या गांग्या उर्फ गंगोली, दाद्या आणिक बरंच काही ... यानं आज अतिशय क्रिटीकल क्षणी शतक मारून स्वतःचं नाणं खरं केलंच नाही तर ठानठान् वाजवून पण दाखवलं ... त्याने टिव्हीतून एक नजर माझ्यावर टाकली आणि मला म्हणाला " घन्यवाद माझ्या दोस्ता , ९६ च्या विश्वकरंडकापासून तूच एकटा होतास जो प्रत्येक चांगल्या वाईट क्षणी माझ्या बरोबर होतास .. माझा उत्साह वाढवत होतास .. " आता लोक म्हणतील की छ्या .. टार्या काही पण बडबडतोय येड लागलं त्याला .. पण नाही ... भावना को समझो (रुपालीच्या भावनांना मी समजलो पण उमगलो नाही ... पुन्हा खोट्टा पश्चाताप... काय मी एक रन काढला किंवा राहूल द्रविड ष्टाईलने विकेटकपूर कडे ऐटीत बॉल सोडला , तर रुपालीच्या तोंडावरचं कौतूक लपता लपत नसे ... आहाहा !! म्हणून मी २००४ च्या उन्हाळ्याच्या क्रिकेट सिझन मधे एकच गाणं फुल आवाजात बडवायचो माझ्या संगणकावर (माझ्याकडे संगणक आहे , पी.सी. नाही याची कृ घमुद्दीन खाँ आणि (आंबट)चवीने वाचणार त्याला विप्र देणार यांनी कृपया नोंद घ्यावी) . हा तर मी काय सांगत होतो .. मी माझ्या संगणकावर एकच गाणं बडवायचो .. समर ऑफ २००४ .... कारण दोज वर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ ... नंतर रुपालीचा पी.सी आला ... आणि ती पण सेमच गाणं बडवायला लागली ... पण मी कळतंय पण वळत नाय ... पुन्हा असो ...
अरे किती विषयांतर करताय तुम्ही लोक ? मी आपल्या दादाच्या दणकेबाज शतका बद्दल बोलतोय ना ? हो .. तर दादा मला म्हणला घन्यवाद ... मी त्याला म्हंटलं ओके ओके . .. चल आता जास्त धावा नको करूस ...धोण्याला थोडी धुलाई करू दे .. तो हरभजन तिकडे ड्रेसिंग रूम मधून बायसेप बेली दाखवून माकडचाळे करतोय .. त्याला येउंन दे पटकन .. आणि याचा प्रूफ पहा ... दादाने माझं ऐकलं आणि १०२ वर गुमान बाद होउन परतला .. पहा पहा .. वैयक्तिक धावांचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही .. दादाने मात्र केवळ माझ्या एका शब्दावर आपली विकेट सोडली .. अशाच प्रकारे मीही माझ्या गल्लीक्रिकेट कारकिर्दीत धावांचा मोह टाळला ... माझ्या नंतर रुपालीचा छोटा भाऊ बॅटिंगला येत असे ना .. मी आपली १० धावांची सेंच्युरी झाली की (एकदा बॅट रुपाली कडे दाखवून) तीच बॅट चपट्याला (रुपालीचा छोटा भाऊ चपट्या :) ) देत असे .. तिथेही एक फिल्मी लुक देण्याचा मोह आवरत नसे .. परत शेकडो कॅमेरे माझ्यावरच रोखलेले असायचे ना .... मग ? पुन्हा विषयांतर ? असू द्या असू द्या .. .असं म्हणत पुन्हा आपले आहेत नवाचे पाढे ... माझ्या माहितीतले बरेच लोक्स आहेत ... "चल आता निघतो मी " म्हणत पुन्हा तसेच बसून रहाणार ... असे करत ते "चल आता निघतो मी लै टाइम झाला " याची पंधरा पारायणे करत ... असो (होय पुन्हा असो )
गांगुलीने अत्यंत दडपणाखाली शतक लावलं याचं कौतूक अभिमान आणिक बरच काही वाटलं .. आता आमचा गांगूली मानाने निवृत्त होईल .. आणि आमच्या जिवंत आत्म्याला जिवंतपणीच थोडी शांती मिळेल ... तेवढी रुपालीसमोर थोडी अशीच शांती मिळाली असती तर बरं होतं ... असो ..
गांगूलीला पुढील आयुक्ष सुखा-समाधानाचे जाओ !!
ता.क.: रुपाली या 'नामा'चा मिवावर कोणी रुपाली असल्यास तिच्याशी काहीही संबंध नाही , असेल तो योगायोग समजावा. ता.क. संपले
----------------------------------------------------------------------------------------(गांगूली आणि रुपाचा फॅन- टौरव टांगूली)
वाचने
6232
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
जबरदस्त
अभिनंदन
टा-या
मस्त
अच्छा
In reply to अच्छा by विनायक प्रभू
येहिच मै
स्ट्रेट
In reply to स्ट्रेट by विनायक प्रभू
मेलो रे हसुन बाबा ....
In reply to स्ट्रेट by विनायक प्रभू
सर...
In reply to सर... by फटू
कसले साम्य
In reply to कसले साम्य by विनायक प्रभू
हेहेहे...
In reply to स्ट्रेट by विनायक प्रभू
विप्र
आधी वाट्ले
In reply to आधी वाट्ले by अनिता
आभारी आहे
टारझन महाराज .... की जय...
फटकेबाजी मस्तच
ये हो
व्वा..भारी लिहलयं