Skip to main content

उद्वेग विसरून कसं चालेल?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 04/11/2008 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात केव्हातरी मुखवटे चढवावे लागतात रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर भंगलेल्या तोंडाचेही मुके घ्यावे लागतात मी असा असतानाही मी तसा आहे ह्याचं नाटक करावं लागतं पण मग हे नाटकच आहे हे विसरून कसं चालेल? कसले कसले असले तसले झाले की मग असले तसले कसले कसले होतात आणि मग मी माझ्याच हिंमतीवर आलो आणि माझ्याच हिंमतीवर रहाणार असे म्हणताना ही हिंमत तात्पुर्ती आहे हे विसरून कसं चालेल? अंधार दूर करणारा प्रकाश पाहून कंदीलाचे आभार मानावे लागतात पण मग कंदील हातात धरून प्रकाश दाखवणार्‍याला विसरून कसं चालेल? गेले ते गेले आणि राहीलेले पण जाणार असे म्हणताना आपण पण राहील्यातले आहो हे विसरून कसं चालेल? जो त

(होता खमंग, होता चकणाहि खास बाकी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 04/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम कारागिरी 'होता वसंत, होता सुमनात वास बाकी' वाचून आम्ही भारावून गेलो आणि त्या खुषीतूनच हे पहिल्या धारेचे विडंबन जन्मले! ;) होता खमंग, होता चकणाहि खास बाकी सारेच टुन्न होती पण आसपास बाकी जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही हातात फक्त काजू करणे खलास बाकी! फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा सांगू तिला कसे मी?

तासगांवचं घर..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 04/11/2008 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तासगावचं घर : श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं. शाळेसमोर, मेन रोड, तासगांव. असा पत्रिय पत्ता. तासगावात विचारायचे झाल्यास गोखले वकिलांचा वाडा. अस जर कोणाला विचारलं तर डोळे झाकून आणून सोडतील. नरगुंदे बोळात मोठा दरवाजा त्यातल्याच एका दाराला छोटा दिंडी दरवाजा.. दरवाजातून आत गेलं की, उजव्या बाजूला रिकामा गोठा, डाव्याबाजूला एका ओळीत बिर्‍हाड करूंच्या खोल्या. मला आठवणारे बिर्‍हाड्करू म्हणजे माणगांवकर शिक्षक आणि एक कोणितरी नर्स . पुढे गेलं की, मोठ्ठ अंगण .. अंगणाच्या डाव्या बाजूला माडीवर जाण्यासाठी केलेला लाकडी जीना. बरोबर समोर.. सारवलेलं अंगण आणि जुन्या पद्धतीचं घराचं दार..

तिखटा-मिठाचा दलिया

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 04/11/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १ वाटी दलिया १ मध्यम कांदा चिरून १ टोमॅटो बारीक चिरून घरात असतील त्या सर्व भाज्या- प्रत्येकी अर्धी वाटी भोपळी मिरची बारीक चिरून, फ्लॉवरचे तुरे, गाजराचे तुकडे, बेबी कॉर्नचे तुकडे १ ते २ चमचे मक्याचे दाणे थोडे मटाराचे दाणे सजावटीसाठी खोबरे, कोथिंबीर फोडणीसाठी तेल फोडणीचे साहित्य- मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल मिरचीचे २/३ तुकडे, ५ ते ६ कढिपत्त्याची पाने अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ कृती :- एका भांड्यान दलिया घेऊन तो चांगला भाजून घ्यावा (उपम्यासाठी रवा भाजत

विप्रंना एक प्रश्न...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 04/11/2008 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून, विप्र मिपावर समुपदेशनाबद्दल, विशेषतः वाढत्या वयातील मुलं आणि त्यांचे पालक यांच्या बाबतीतल्या समस्यांबद्दल लिहित आहेत. त्यांचे बरेच लिखाण, एखाद्याला पटो वा न पटो पण दखल घेण्याजोगं असतं. त्यांनी घेतलेल्या समुपदेशनाच्या वर्गांबद्दल पण इथे मिपावर लिहून आलं आहे. मला विप्रंना असं विचारायचं आहे: ०१. तुम्हाला असे वर्ग घेताना साधारण कश्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो? ०२. तुम्ही जे काही करता आहात त्या मधे अजून व्यापकता आणण्याबद्दल तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का? ०३.

फॅशन

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 04/11/2008 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीच्या मुर्हुतावर प्रर्द्शीत झालेला मधुर भांडारकर दिग्द्र्शीत चित्रपट आहे फॅशन चित्रपटाचे कथानक हे फॅशन इड्स्ट्री भोवती फिरते आहे हा मधुर भांडारकरचा अजुन एक चांगला चित्रपट आहे त्याचे या अगोदर्चे चांदणी बार, सत्ता, कॉर्पोरेट आणी ट्राफिक सिग्नल हे सुध्दा चांगले चित्रपट होते मधुर भांडारकर एक वास्तववादी दिग्दर्शक आहे यात शंका नाही आपलि या चित्रपटा बद्दल ची मते कळवा वास्तववादी चित्रपट वेडा कोतवाल?

येथे..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 04/11/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
दृष्टीस हिमनगाचा वरचाच बर्फ़ येथे. करतात मग कशाला भलताच तर्क येथे. लाखात मोल ज्यांचे कवड्यात भाव झाले. अर्थाशिवाय नसतो कुठलाच "अर्थ" येथे. निष्पाप अन निरागस ते वय निघून गेले. छळतो कटाक्ष आणि सलतात स्पर्श येथे. फुलशील केवड्यासम, ध्यानात ठेव तेव्हा, नसतात फक्त भुंगे, वसतात "सर्प" येथे. अश्रूत चिंब भिजल्या शब्दास भाव नाही लावायचा व्यथेचा हलकाच "वर्ख" येथे. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

व्यसनमुक्ती

लेखक निमीत्त मात्र यांनी मंगळवार, 04/11/2008 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील ऍक्रॉन शहरातील १९३५ मधील एक संध्याकाळ. त्या संध्याकाळी दोन अट्टल बेवडे एकमेकांना भेटले. गप्पा मारत बसले आणि चमत्कार म्हणजे गप्पा मारता मारता प्यायचं विसरले. त्यांच्या गप्पांतून दुनियेत एक नवीनच शोध लागला. दारूपासून दूर राहण्याच्या तंत्राचा. पण त्या दोघांपैकी कोणीही मानसशास्त्रज्ञ नव्हता. एक होता शेअर दलाल बिल विल्सन तर दुसरा होता डॉक्‍टर बॉब स्मिथ. खरे तर यापूर्वी मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहिले जाई (आज ही बरेचजण मद्यपाशग्रस्ताकडे तुच्छतेने पाहतात) त्यांना उपदेशाचे डोस पाजले जात. पण समानतेच्या पातळीवरून त्यांना कोणी समजून घेत नव्हते.

माझी मराठी फिल्लम -बाजी

लेखक मूखदूर्बळ यांनी मंगळवार, 04/11/2008 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांना येणारी सध्याची दूरावस्था लक्षात घेता, मराठी चित्रपट उद्योगाचे पूनरज्जीवन (खरे तर पूनरुत्पादन, पूण्यवचन असे भारी भरकम शब्द आठवत होते. पण त्यातल्या त्यात अधिक अगम्य शब्द लिहीलाय 8} ) आम्हीही मायबोली मंडळाच्या वतीने मराठी चित्रपट काढायचा योजला आहे. कथानक तयार आहे. फक्त अर्थ पूरवठा (सरकारी अनूदाना व्यतीरिक्त) आणि प्रेक्षक पूरवठा झाला की चित्रपट लगेचच मूक्त (रीलीज हो) करू.