Skip to main content

दोन कविता

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 31/10/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मधुकर जरी पिऊनी आता झालास तू बेहोष.. शोषून फुलांचे सारे जरी मधुकोष .. हा व्यर्थ तुझा आवेश, तुझा हा अंध.. पाकळया फुलांच्या तुजसाठी झाल्या बंद रुसलेले गीत रुसले गीत शब्दात अडखळे शब्द ओठावर ये ऊन झाले ते नि:शब्द येऊन तळमळे अधरावरती गाणे नशिबात कळीच्या निर्माल्याचे जिणे
लेखनविषय:

वाचने 1924
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कविता... हा व्यर्थ तुझा आवेश, तुझा हा अंध.. पाकळया फुलांच्या तुजसाठी झाल्या बंद .........खूपच छान !