संशय आणि शंका
आपल्या पोलीस दलातील तीन आधिकार्यांच्या मृत्यूला कारणीभूत दहशतवादीच आहेत की आणखी कुणी असा संशय श्री. अंतुले यांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्ती सोडल्यास प्रत्येक व्यक्ति ही संशयाच्या वर्तूळातच असते या प्रचलित सिद्धांतास अनुसरूनच श्री. अंतुले यांचे विधान असल्याने त्याबद्दल आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.
परंतू यानंतर आता अजूनही काही शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात.
उदाहरणार्थ - अतिरेक्यांनी रेल्वेस्थानकात सामान्य व्यक्तिंवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी कामा हॉस्पीटल पाशी पोलीस आधिकार्यांवर हल्ला केला. ताज व इतर हॉटेलांत त्यांनी उद्योगपती / विदेशी नागरिक यांच्यावर हल्ला केला.
मिसळपाव
