Skip to main content

आफ्रिका!!! आफ्रिका!!!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 01/01/2009 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत नव्हतं. पण पाचवी मधे ती पण अडचण दूर झाली. पाचवी संपेपर्यंत मला सगळ्या देशांची नावं आणि त्यांच्या राजधान्या वगैरे पाठच होऊन गेल्या. माझी आई पण कधी कधी माझ्या बरोबर बसायची. आम्ही (ती आणि मी) एक खेळ पण खेळायचो.

मित्र/मैत्रीणी-ठेवलेली गमतीशीर नावं/त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं

लेखक वाटाड्या... यांनी गुरुवार, 01/01/2009 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
"णमस्कार्स लोक्स," - टारुची कृपा..ह..च घे रे..:) बर्‍याच दिवसापासुन एक करमणुक प्रधान विषय डोक्यात घोळत होता...आज त्याला एक कारण मिळालं ते म्हणजे आमच्या एका मित्राच लग्न झालं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या... तर आजचा विषय आहे..मित्र/मैत्रीणी आणि त्यांना ठेवलेली गमतीशीर नावं किंवा त्यांच्या नावाचं केलेलं खोबरं..कारणं काहीही असोत जसे.. १. काही सवयी, २. रहाण्याची / दिसण्याची / खाण्याच्या सवयी/स्टाईल म्हणुया... ३.

थर्टीपस्ट नाईट २००७

लेखक ब्रिटिश यांनी बुधवार, 31/12/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
थर्टीपस्ट नाईट कदीची वाट बगत होतू ह्या दीवसाची. रम्या, सूर्‍या, म्हादेव न मी चौगांनी पक्का बेत ठरवलावता.सगली तयारी केलती. बॅगपायपरचे दोन खंबे,चाकन्याला अंडी, शेंगदाने,स्टार्,बॉईल चना आनुन ठीवल व्हत.बारक्याला मटन आनाला पाटवला. सूर्‍याच्या शेतात बरूबर सात वाजता जमाच ठरल होत. अंगात येगलाच वारा येत व्हता. संद्याकाली साडेसा ला सूर्‍याची शीटी आली. मी भायेर नींगालू. शेतात पोचलु. रम्या न म्हादेव वाटच बगीत व्हते. आमाला बगीतल्या बगीतल्या 'थर्टीपस्ट नाईट येन्जाय ~~~' रम्यान बोंब ठोकली. आर कूट होता र आवरा टाईम ? कती वाट बगाची तूमची ?

पंचमचे पहिले गीत

लेखक प्रदीप यांनी बुधवार, 31/12/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
तसे म्हटले तर चित्रपटांतील प्रत्येक गीत एक स्वतंत्र प्रकल्पच असतो. कधी गीत आधी लिहीले जाते व त्याबरहुकूम चाल बसवली जाते, तर कधी चालीची फ्रेम प्रथम तयार असते, व गीतकार त्यावर गीत लिहीतो. काही असले तरी त्या दोघांचा सुंदर मिलाप झाला व ते प्रथितयश गायकांनी/ गायिकांनी निपुण साजिंद्यांच्या साथीने गायले की एक वेगळीच बहार निर्माण होते. ह्यापूढे त्याचे चित्रीकरणही त्या गीताच्या साजेश्या तर्‍हेने झाले तर ते गीत प्रेक्षणीयही ठरते, पण अनेकदा हे असे होतेच असे नाही.

मधुबालाचे असीम सौंदर्य !

लेखक वाहीदा यांनी बुधवार, 31/12/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
Office मध्ये आल्या बरोबर मीपा ची site उघड्ली अन तात्याच्या क्रुपेने मधुबालाचे असीम सौंदर्य youtube वर पाहीलं ! आह को चहिये एक उम्र असर होने तक ... कौन जिता है तेरे जुल्फ के सर होने तक !! ~ गालीब खरे आहे रे बाबा गालीब ! आम्ही मुली असुन तीच्या चेहरयावरुन नजर नाही हलवु षकत तर मुलान्चे हाल काय म्हणावे !

गजल

लेखक mahesh jahagirdar यांनी बुधवार, 31/12/2008 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
हासताना याद आली सोसताना याद आली अगणी प्राजक्त हा मी वेचताना याद आली सूर माझ्या अतरीचे छेदताना याद आली चादण्याशी बोलताना जागताना याद आली घेतला कोणी उखाणा ऐकताना याद आली रोखलेली आसवे तू या क्षणाना याद आली महेश जहागीरदार

`संकल्प'यात्रा!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 31/12/2008 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांची आसनेही हलली. हल्ली असं काही झालं, की मीडियावाले लगेच चांव चांव करायला लागतात आणि दिवस साजरा करण्यासाठी तेवढ्यापुरता कुणाचा तरी बळीचा बकरा करून टाकतात. पोलिसांपासून अतिरेक्‍यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्याचं तपशीलवार "लाइव्ह कव्हरेज' देणाऱ्या मीडियाने एका गंभीर प्रसंगात शिवराज पाटलांना लक्ष्य केलं. त्यांनी दिवसभरात तीनदा कपडे बदलल्याचीच "ब्रेकिंग न्यूज' केली. त्यामुळं तो अनुभव लक्षात घेता, मुंबई हल्ल्याच्या वेळी शिवराज पाटलांनी तीन दिवस कपडेच बदलले नाहीत.

शुभेच्छा!!

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 31/12/2008 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
:H सरत्या वर्षाला बाय बाय करुन नविन वर्षाचे स्वागत करुया!! :SS :-C मिसळपाव वरील सर्वा॑ना नविन वर्षाच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा!!! :-C जयेश माधव

पायनॅपल-वॅनिला केक!

लेखक रेवती यांनी बुधवार, 31/12/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- मैदा १.५ कप, साधी साखर (पिठीसाखर नको) १ कप, बेकिंग पावडर २ टी स्पून, मीठ २/३ टी स्पून, लोणी ७ टेबल स्पून, दूध २/३ कप, व्हॅनिला इसेन्स १ टी स्पून, अंडी २. बेकिंग पॅन, हँड मिक्सर. कृती : - एका भांड्यात मापाचे कक्ष तापमानाचे (रुम टेंपरेचर) लोणी व साखर चमच्याने एकजीव करुन घ्यावे. दुसर्‍या भांड्यात अंडी फोडून चमच्याने फेसून घ्यावीत. पहिल्या भांड्यातील लोणी साखरेचे मिश्रण फेसलेल्या अंड्यात मिसळावे. चमच्याने हलवून घ्यावे. आता मापाचा मैदा घेऊन त्यावर मीठ व बेकिंग पावडर घालावी. हळूहळू मैदा भांड्यातल्या मिश्रणात टाकावा आणि चमच्याने हलवून सारखे करावे.