मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धूसर राखाडी..

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
धूसर राखाडी.. ================== . . क्षण क्षण जळताना.. कण कण होते राख.. राखे खाली..आत आत.. निखाऱ्याची गं धग.. . क्षण क्षण विझताना.. कण कण धूर धूर.. दाटलेल्या हुंदक्यात.. धूसर धूसर आग.. . अंग अंग राखाडी.. जळल्या निखाऱ्याच.. ठिणगी गाडलेली.. चटक्यात दावे राग.. . . ================== स्वाती फडणीस ..... २३-१२-२००८

वाचने 1357 वाचनखूण प्रतिक्रिया 2

प्राजु Wed, 12/24/2008 - 06:11
ठिणगी गाडलेली.. चटक्यात दावे राग.. अर्थपूर्ण.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/