बाप्पाला स्वेटर
पुण्यात लाडक्या बाप्पाला स्वेटर घालण्यात आले. कालच ही बातमी टीव्हीवर पाहिली होती. स्वेटर आणि कानटोपी घातलेला गंपती बाप्पा फारच क्युट दिसतोय. :)



माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर
साहित्य :
कोळंबी (श्रिंप/प्रॉन्स) अर्धा किलो
चवी पुरते मीठ
लाल तिखट १ चमचा
हळद चिमुटभर
आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट
अर्धी वाटी रवा
१ लिंबु
अर्धी वाटी तेल / तेलाचा (पॅम) स्प्रे
कृती :
प्रथम कोळंबी व्यवस्थीत साफ करुन त्यावर लिंबु पिळावे. कोळंबी साफ केल्यावर त्यातील पाणी निघाले आहे ना ह्याची खात्री करावी. त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट हिरवी पेस्ट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे.