हाडंबिंड-दातबीत अनुभव
नमस्कार मित्रांनो,
मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "हाडंबिंड-दातबीत तुटणे/मोडणे " अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का?
मी स्वत: एक व्यावसायिक "डेंडल अँड बोन इंशुरेंस एजंट"(दंत व अस्थी विमा एजंट) असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर....
तुम्हाला कधी अशा हाडं तोडणार्या आणि दात पाडणार्या शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? At Wits End
अशा धांसू शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
इथे चर्चा अपेक्षित आहे....
जमल्यास माझ्या ब्लॉगवर जाऊन माझ्या काही दंतकथा किंवा अस्थीकथा( ज्या सत्य-असत्यतेच्या सुक्ष्म सीमारेषेवर आहेत) आणि त्यातील "दात तोडणार दंतवैद्य" व "हाडे मोडणारा अस्थीवैद्य" या दोन कथांचा नायक म्हणजे मी स्वत: आहे....कथा जरा अतिरंजीत आहेत पण वाचुन बघा... आणि माझा भाउ पण मला या कार्यात मदत करतो .. जे विमे काढत नाहीत त्यांचा मी व माझा भाउ गनिमी काव्याने व्यवस्थित "पत्ते बिछाके" मग "गेम करतो"
आणी हो इथे मात्र तुमचे अनुभव नक्की लिहा....काही शंका असतील तर मी माझ्यापरिने मदत करेन...
कुबड्या खवीस
अस्थी-दंत विमा एजंट (एक्स इगल विंग कमांडर)
सुरध्वनी क्रमांक : +०० ०००० ०० ००००(एक्टेंशन : ०००)
आमच्या शाखा : युगांडा(हेड हापिस्),केन्या, टांझानिया,मॉरिशस्,इथोपिया,घाणा,नायजेरिया, बुरुंडी,रवांडा,
लवकरच भारतात येणार आहोत , पहिले १००० विमे फ्री फ्री फ्री ...
आजच या नाव नमुद करा , आयुष्यभर दात-हाडांची काळजी विसरा ...
कोणत्याही कागद पत्रांची अवश्यक्यता नाहीए .. आमच्या कडून इंश्युरंस काढला की कोणीही तुमची हाड आणि दाताला हात लावणार नाही .. मी आज पर्यंत बर्याच लोकांचे विमे काढले, त्यांची सुरक्षित हाडं आणि पांढरे-पिवळे दात पहाताना मला एक समाधान भेटतं .. आज ते माझ्यामुळेच स्वत:च्या पायावर स्वतःच्या हाताने टमरेल घेउन नदी पर्यंत तुळस लावायला जाउ शकतात ... आणि माझ्याच मुळे ते दिलखुलास पणे क्लोज-अप स्माइल देउन ज्यांवर त्यांचा राग आहे त्यांच्या नाकातले केस आपल्या तोंडातला वासाने जाळू शकतात ...
आज मी इतकी लोकं सुखी केलीत याचा मला अभिमान वाटतो ...
वाचन
10631
प्रतिक्रिया
0