Skip to main content

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

लेखक एकलव्य यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात.

'सत्य म'ला उमगले!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 09/01/2009 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
'सत्य म'ला उमगले आणि फुटला भ्रमाचा फुगा किती मिरवला आयटीचा रंगीत पण आखूड झगा कोटीच्या कोटी उड्डाणे उगीच दाखविली जगा सत्य कळले तेव्हा सत्य सगळ्यांना डसले बघा रिसेशनने धरलाय सगळ्यांच्या धोतराचा सोगा ई एम आय चे आकडे करतायत मेंदूमध्ये योगा नशीब पेपर सेट करतयं, म्हणतयं "आता भोगा" आऊट ऑफ सिलॅबस आहे पेपर, नशीबच देतयं दगा आयपॉड आणि आयफोन चा 'आय'शप्पथ क्षीण झाला दंगा पिझ्झा?
Taxonomy upgrade extras

चटपटीत कोलंबी

लेखक नाटक्या यांनी शुक्रवार, 09/01/2009 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात एका केरळी मित्राकडे जेवायला गेलो होतो. तेव्हा त्याच्या आईने एक प्रकारची चटपटीत कोलंबी केली होती. मला ती प्रचंड आवडली आणि मी एकट्याने १५-१७ कोलंब्या फस्त केल्या. एव्हढे कमी म्हणून कि काय पण दुसर्‍या दिवशी घरी दोन पौंड आणुन (रम बरोबर) हादडल्या. त्या कोलंबीची चित्रमय कॄती येथे देत आहे. (चित्रात कोलंब्या कमी दिसतील कारण मिपासाठी पुन्हा खास फोटोसेशन करण्यात आले.

मॅट्रिक्स...[Matrix]

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 09/01/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
मॅट्रिक्स...[Matrix] तु एक चैतन्यमय,अथांग मन,ना आदि ना अंत, तु स्वयंभु उर्जा स्रोत,मनात तुझ्या विचार अनंत अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना करतो,लागे क्षणाचाच वेळ निर्मीति करणे अन,लय करणे,हा तुझा आवडता खेळ अतर्क्य,अगम्य,गुढ चमत्कारीक स्वभाव तुझा,न लागे मेळ, ब्रह्मांडा तल्या उलटा पालटी म्हणजे ,सारे तुझ्या मनांतले खेळ. मनातच निर्माण केले हे ब्रह्मांड तु,मधे पडदा टाकला Matrix चा, मायेचा दिले आव्हान आम्हाला, शोध मला,माझे अस्तित्व,खेळ तुझा, डोक्याबाहेरचा. तुझ्या Matrix मायेची जादु अशी, सारे आज्ञानी "ज्ञानी" झाले मीथ्या जग सत्य समजु लागले,आणि तुला मिथ्या ठरवण्यास पुढे सरसावले. जिथे हरते बुध्धी,ज्ञान

आपण यांना पाहिलंत का?

लेखक शेणगोळा यांनी शुक्रवार, 09/01/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी मुंबई दूरदर्शन केन्द्रावर आपण यांना पाहिलंत का हा कार्यक्रम दाखचायचे. तसे एक सदर मिपावर सुरू करत आहे. आपण यांना पाहिलंत का? नांव - रामलिंगम राजू. व्यवसाय - माजी अध्यक्ष, सत्यम कम्प्युटर्स लिमिटेड. बुधवार दि. ७ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. कुणाला आढळल्यास हैद्राबाद-पोलिस व सेबी यांच्याशी संपर्क साधावा.

मी अगदी मजेत आहे

लेखक मोगॅम्बो यांनी गुरुवार, 08/01/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एका इंग्रजी कवितेचा अनुवाद आहे. मूळ कवी कोण ते मला माहीत नाही. कविता कधी आणि कुठे वाचली ते सुद्धा आठवत नाही. पण आवडली म्हणून लगेच अनुवाद करून ठेवला होता. तो आज तुमच्यासाठी प्रसिद्ध करतोय.
Taxonomy upgrade extras

थापा - एक गोष्ट.

लेखक मॅन्ड्रेक यांनी गुरुवार, 08/01/2009 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत जायला निघतो तेव्हा रोज म्हणते आई , रस्ता नीट क्रॉस कर करु नको घाई. डोळे ठेव उघडे रस्त्यात - दिसली गंमत काहि , घरी येउन सांग बात मारायचि नाहि.

पालक कॉर्न पुलाव

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 08/01/2009 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खवय्यांनो, तुमच्यासाठी पालक कॉर्न पुलावाची कृती देत आहे, कशी वाटली ते जरूर कळवा.
पालक कॉर्न पुलाव
साहित्य:- १ वाटी बासमती तांदुळ अर्धी जुडी पालकाची पाने अर्धी वाटी मक्याचे दाणे अर्धी वाटी गाजराचे उभे पातळ चिरलेले काप अर्धी वाटी कोथिंबीर १०-१२ पुदीन्याची पाने १ इंच आलं ७-८ लसूण पाकळ्या ५-६ हिरव्या मिरच्या ३ टे.स्पून तेल चवी

गोष्टीतली गोष्ट

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 08/01/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वासराव सरपोतदार, एक प्रथीतयश लेखक. विशेषतः 'प्रवास वर्णन' आणि 'व्यक्तीचित्रण' ही त्यांची खासीयत. त्यांच्या लिखाणाची सहज शैली वाचकांना भूल पाडत असे. पण गेले काही महीने, ते अगदी अज्ञातवासात गेलेले. नेहेमीच्या धकाधकी पासून एकदम दूर. अगदी थोड्याच दिवसांची गोष्ट होती. काही दिवसांनी ते आपला नविन संग्रह प्रकाशीत करणार होते- 'भय' कथांचा. भय कथांतले जवळ जवळ सगळेच विषय त्यांनी पिंजून काढलेले. रात्रीचे पडघम, सैतान, काळी मांजर , अघोरी विद्या, तांत्रीक, पछाडलेला वाडा .... सगळे म्हणजे अगदी सगळेच. आता एक 'शेवटची' गोष्ट लीहायची. म्हणजे १० गूढकथा/ भयकथांच्या पूस्तकांचा संचच ते प्रकाशना करीता देणार होते.