मौजा ही मौजा
आपण 'नाही ' ला घाबरतो. विचारायचे असते,पण नकार मिळेल ह्या भितीने विचारतच नाही.
१९९४ साल असावे. भारतात "फ्लाय बाय कंप्युटर" ची बोईंग विमाने सुरु झाली होती. कुटुंबासकट गोव्याला कुलदैवताला जायचा बेत रचला. विमानाची तिकीटे काढली. चेक इन करेपर्यंत ३०३ बोईग आहे हे माहित नव्हते. विमानात शिरल्यावर एकंदरीत स्टाइलने खुश झालो. बायको तर अवाक झाली. टेकऑफ घेतल्यावर चिरंजिवांनी (वय सुमारे साडे पाच)कॉकपीट बघायचा हट्ट धरला. खरे तर मला पण बघायचे होते. मी उठलो. लगेच बायकोने लगेच आहेर दिला. "वेड लागले आहे का? गप्प बसा. असे कोणालाही पायलट आत घेत नाही. अपमान कशाला करुन घेताय"? मी बसलो. मुलाला धीर निघेना.
मिसळपाव
