मराठी चित्रपटातील संवादच दळीद्री?
राम राम मिपाकरहो,
देवदत्तरावांनी सुरू केलेला सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये हा धागा वाचनात आला. त्यात अनेकांनी हिंदी चित्रपटातील लक्षात राहिलेली वाक्ये, लक्षात राहिलेले संवाद नोंदवले आहेत. याकरता हिंदी चित्रपट सृष्टीचा आपल्यावरील पगडा कारणीभूत आहे, तसेच तुमच्याआमच्या सारख्या सर्वसामान्य प्रेक्षकांना जसेच्या तसे लक्षात राहावेत इतपत त्यातील संवाद/वाक्ये परिणामकारक आहेत असे म्हणावे लागेल.
मिसळपाव