Skip to main content

ईंटर नेट्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/03/2009 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी आहे ईंटर नेट्या, ईंटर नेट्या सकाळ संध्याकाळ ईंटर नेटतो ईंटर नेट हेच झालेत चक्षु माझे त्यातुन दुनियेस मी पाहतो,.समजतो मी ऑरकुट्या, मी रोज ऑरकुटतो सा~या प्रोफाइल मधे मी भटकतो माहिति त्रुष्णेचा चा रोग लागला लाखो साईट मी सर्फितो,सर्फितो पडला जर एखादा प्र्श्ण मजला उत्तरासाठि मी गुगलला गुगळतो विसर पडत चालला मला जगाचा व्हरचुअल जगातच मी आता रमतो स्वत:चि माझी ओळ्ख विसरलोय मी इ मेल आय डी ने मी ओळ्खला जातो अविनाश

किमया

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 15/03/2009 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
सांग ही किमया कशाची? मी नवी, जग हे नवे सांगती माझी कहाणी पाखरांचे हे थवे पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी सप्तरंगी इंद्रधनूचे रंगगहिरे ताटवे? शोधले मी आज माझे हरवलेले सूरही आणि वा-याने सुरांना बांधले नूपूरही गीत माझे मोरपंखी भावनांना जागवे मीच गाणे कोकिळेचे चातकाची मी तृषा मीच कातर सांज हळवी मी उषा अन मी निशा ज्योत माझ्या अन्तरीची वाट मजला दाखवे
Taxonomy upgrade extras

वारकरी

लेखक हेरंब यांनी रविवार, 15/03/2009 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजच, मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी वारकर्‍यांनी घेतलेली भूमिका वाचून विषाद वाटला. माझी सर्व वारकर्‍यांना हात जोडून विनंति आहे की त्यांनी ही टोकाची भूमिका मागे घ्यावी. आनंद यादव यांनी माफी मागितलेली आहे. पुस्तकही परत घेतेले आहे. तंव्हा आता आणखी ताणू नये. वारकरी हे देवाला जवळचे. आपण जेवढे देवाच्या निकट जातो तसतसे आपल्यातली दयाळूवृत्ती वाढली पाहिजे. राग, लोभ, द्वेष, मत्सर वगैरे षड्रिपु गळून पडले पाहिजेत. खर्‍या अर्थाने वारकरी व्हा, कुणाचे तरी 'वार'करी होऊ नका.

काव्य झुरळे- एक मंथन

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 15/03/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
(होळीचे औचित्य साधून,मिपावरील एक नव कवी तुषार शिंतोडे ह्यांची एक ज्वलंत कविता (म्हणजे ज्वलंत प्रतिसाद मिळवणारी कविता ) फॉलो करण्याचा एक प्रयत्न. ह्या प्रयत्नांमागे कुणालाही दुखावण्याचा किंवा सुखावण्याचा कुठलाही अंत्यस्थ (का अस्वस्थ) हेतू नाही. कृपया हलक्याने घ्यावे.
Taxonomy upgrade extras

श्यामची आई

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 15/03/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌। छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।। छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या.

हैद्राबादी पाटी!

लेखक शक्तिमान यांनी शनिवार, 14/03/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार पुणेरी पाट्यांची महती हैद्राबादेतही पोहोचली म्हणायची.... ही पहा मी टिपलेली एका पाणपोईबाहेर लावलेली एक चपखल व लक्षवेधक हैद्राबादी पाटी.... पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की :)

सुचिन्हे निर्माण़ झाली आहेत का?

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 14/03/2009 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर काही लेख/चर्चा मंदी, आयटी, महागाईबद्द्ल लिहिलेले वाचल्यावर हे लिहावेसे वाटले.
From new
वरील चार्टमधे ०% ही स्थिती म्हणजे जेथून तो इंडेक्स खाली यायला लागला तो क्षण. १.