महाराष्ट्र टाईम्स मध्ये मागे एक सदर आल होत... विषय होता "लव टू मरेज प्रवासवर्णन" मी थोड वेगळ पण स्वानुभवाने लिहीण्याचा प्रयत्न केला, आज "मिसळ पाव" चा मेम्बर झालोय तर म्हटल सुरुवात त्या लेखानेच करु कारण तो लेख ह्रदयाच्या अगदी जवळ आहे! पहा तुम्हाला आवडतो का... लि़खाण सुधारण्यासाठी आलेल्या सूचना व टिका, दोन्हीचे स्वागत!
प्रेम काय असते हे कळायच्या अगोदरच प्रेम करून मोकळा झालेला मी!! (Thanks to Bolywood Movie संस्कार)... जेव्हा विचारांमध्ये प्रगल्भता आली, सारासार विवेक बुद्धी जागृत झाली तेव्हा."मी कोणावर खरच प्रेम करू शकतो का?" हा यक्षप्रश्न समोर उभा ठाकला. त्यातही अगदी अजुन Bolywood स्टायलमध्ये प्रेम करायचा फायनल.प्रयत्न केला कारण प्रेमाचा कीडा वळवळत होता ना! पण तोही प्रयत्न तोंडघशी पडला. आयुष्याचा बट्ट्याभोळ होता होता वाचला आणि स्वत:च्या निर्णयक्षमतेवर बिलकुल विश्वास उरला नाही. मग मात्र आई-बाबा यांनी सूत्रे हाती घेतली.
त्यांना कस काय कळणार मला कसा जोडीदार हवा असा फाजिल आत्मविश्वास पण तरीही आपल्याला या जगात आणलेल्या आईबाबांना नाही कळणार तर कोणाला कळणार अशी ठाम बाजू घेत मी सर्वांना चकीत करणारा आणि "चल फेकु नकोस","अशक्य","जोक्स पुरे" वेडा झालास का?" अशा प्रतिक्रिया व्यक्त होणारा निर्णय घेतला. मनात कुठे तरी खंत होती की "अरेंज मॅरेज" कराव लागतेय आणि आता जबरदस्त अड्जस्टमेंट करावी लागणार हे देखील कुठेतरी सलत होतच! घरून स्वत:च्या आवडीचा जोडीदार निवडायाच स्वातंत्र्य असूनही आपण अपयशी ठरलो याची खंतही उराशी बाळगून होतोच. आणि मला मुलगी पसंतच पडणार नाही हा तोरा!
मला स्टुडिओ मध्ये जाउन आर्टीफिशियल फोटो काढायचे फर्मान सोडण्यात आले पण मी त्यांचा बेत हाणून पाडला आणि दुबईमध्ये हॉलिडे करतानचा एक फोटो दिला... पण आई आणि बाबा मात्र युद्ध्पातळीवर तयारीला लागले होते. विवाह मंडळे काय.. बायो डेटा बनवणे काय आणि काय काय... या सर्व प्रकारावर हसण्याखेरीज काहीच करत नव्हतो पण आईचा उत्साह आणि धडपड पाहून सुखावत होतो. तिला मनपसंत सून शोधण्याचा ध्यास लागला होता. मला हवी होती सुशिक्षित, सूसंस्कृत, मॉडर्न आणि मॉडर्न असूनही काकूबाई अशी अगदी बायको मटेरियल. थोडक्यात काय तर मृगजळ... कधीही अस्तित्वात न येणारे जोड स्वप्न! ३१ डिसेंबर ला मी रात्रभर धिंगाणा करायला निघणार होतो आणि चक्क मला कोणीतरी पाहायला आले होते... मला हे सगळ भयानक वाटल! शी मला बघायला लोक आले म्हणजे जरा जास्तच झाल , असो! मित्रांना सांगणे शक्यच नव्हत कारण जगाला हसणारा मी आणि जगाला माझ्यावर हसायची संधी कशी पुरवून देऊ? असो, अपेक्षेप्रमाणे मी त्यांना आवडलो,(प्रचंड हशा) आणि आता मात्र बाबांनी उतवळेपणाच्या सगळ्या हद्द पार केल्या व चक्क "उद्या मुलगी पाहायला येतो" सांगून मोकळे झाले. मी तोंड विस्फारल पण त्याच्याकडे त्यांच फारस लक्ष नव्हत! का कुणास ठाउक पण आईच त्या दिवशीच हसण मला असुरी वाटत होत :)
रात्रभर थर्टी फस्ट सेलेब्रेट करून सकाळी घरी आलो तेव्हा लक्षात आल की आज तर आपली मॅच आहे पण मी टेस्ट मॅच खेळायच्या तयारीत होतो आणि विकेट सांभाळून खेळायच आणि इतक्या लवकर बाद व्हायच नाही असा हिय्या करून होतो. तसा प्रतिस्पर्धी पक्षाचा फोटो आणि प्रोफाइल पाहील होत, थोबाड छान होत पण काही विशेष स्पार्क नाही जाणवला. एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत होती की माझी जन्मतारीख १ जून आणी तिची २ जून!
अखेर तो दिवस उजाडला.. १ जानेवारी २००८! वर्षाची सुरवात फारच मजेशीर आणि काहीशी विक्षिप्त! तिला पाहायला गेलो... स्वागत झाल्यावर सगळे स्थानापन्न झाले पण कोणी काहीच बोलेना मला हसू येऊ लागले पण उगाच मुलगा आगाऊ आहे असे वाटू नये म्हणून मी चेहरा प्रयत्नपूर्वक गंभीर करून बसलो होतो. पोहे न दिल्यामुळे आमच्या गोटात जोक्स झाले.. अखेरीस "नवरी मुलगी" (प्रचंड हशा) चहा घेऊन आली. काहीतरी शोभिवंत वस्तू असल्यासारखे सर्व तिच्याकडे पाहू लागले.. दृष्य प्रेक्षणीय होत, सगळे तिला पाहत होते आणि मी तिला सोडून इतरांच्या चेहर्याकडे बघून कसबस हसू आवरत होतो! चहा झाल्यावर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम... माझे "स्क्यूबा डायविंग" "पॅरा
सेलींग" मध्ये इंट्रेस्ट आहे का हे वाहयात ठरवलेले प्रश्न बाजूला सारून जेवण बनवता येते का? हा अगदी साळसूद आणि बावळट प्रश्न विचारला. अपेक्षेप्रमाणे त्याच आगाउ "हो तर, येते म्हणजे काय? येतेच" अस उत्तर आल तेव्हाच ही "जोशी" आडनावाला सॉलिड फिट आहे हा साक्षात्कार मला झाला, सुंदर तर होतीच दिसायला पण बोलणही लाघवी होत, नजर खाली, चेहर्यावर औत्सुक्य आणि भीती अशा संमिश्र भावना पण त्याचबरोबर मी आवडलो असल्याची पोचपावती! मला हव्या असलेल्या काकूबाईचे मुर्तिमन्त उदाहरण! आणि जे व्हायच तेच झाल... पिचवर टिकून खेळायचा निर्धार करून आलेला गडी पहिल्या बॉलमध्ये क्लीन बोल्ड!
दोघांच्या घरातील मॉडर्न वातवरणामुळे आमच बोलण भेटण सुरू झाल! तीच साधेपणच तीच खर सौंदर्य आहे. पैसा, दिखावा यांपेक्षा माणुसकी, प्रेम यांना महत्व देणारी, हसत-खेळत माझ्यातील सन्वेदनाक्षम, हळव्या मला ओळखणार्या "तिच्या" मी प्रेमात पडलोय.. पडलो नाही खरतर ग डा ब डा लोळलोय! आम्ही तासन तास बोलतो... लोकांना आमच्या बोलण्याचा कंटाळा येतो पण आम्ही नॉन स्टॉप चालूच असतो. मोबाईल कंपनी वाले भारी खूष असतात आमच्यावर.. लवकरच आमचा सत्कार होईल असे वाटते. मी परदेशात असलो तरी परिस्थिती वेगळी नसते. आमच प्रेम पैसे आणि वेळ या मर्यादा कधीच पार करून गेलेय! घरून परवानगी असतानाही आम्ही लपून छपून भेटतो, खोटही बोलतो. आमच्याकडे बघून लोकांना संशय येतो की हे अरेंज मॅरेज नाही, यांच नक्की काहीतरी लफड होत :) लव मॅरेजच सगळ थ्रील आम्ही दोघाणने पुरेपूर अनुभवलय.. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलय पण नेक्स्ट वीकेंड्ला आम्ही बॅंड स्टॅंड्ला जाणार आहोत, चोरी चुपके! अरेंज मॅरेजच्या सर्व मर्यादांच भान आम्हा दोघांनापण आहे पण प्रेम करण्याच थ्रिल आम्ही अनुभवतोय!
लोकांचा लव ते मॅरेज असा प्रवास फार सुखावह असतो पण तो मॅरेज या अखेरच्या स्टेशनला येऊन बरेचदा संपतो! कदाचित ध्येयपूर्तीच समाधान झाल्यमुळे पण आमचा हा मॅरेज ते लव असा उलटा सुरू झालेला प्रवास प्रेमाच्या क्षितिजावर अखंड सुरू राहावा... ध्येयपुर्तीच्या शोधात आणि ते एकमेव ध्येय म्हणजे "आमच प्रेम"....
सौरव जोशी ( आमची मुंबई )
वाचने
11076
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लेख.
ऑल द बेस्ट!
मस्त! मजा
मिपावर स्वागत!!
लव टु मॅरेज
स्वागत
छान!
चांगली सुरुवात
खुसखुशीत लेखन ...
धन्यवाद...!
चांगला लेख
स्वागत
मस्त लेख.
लेख
लै भारी
जोशी बुवा
मस्त
जोशीराव
अर्रे सही रे भाऊ!
मस्त...
.
In reply to मस्त... by बिपिन कार्यकर्ते
+१००००
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
प्रवासवर्णन झकास....
हेच वाक्य
In reply to प्रवासवर्णन झकास.... by ढ
ह्यॅह्यॅह्यॅ!!!
In reply to हेच वाक्य by भाग्यश्री
>>साखरपुडा
In reply to ह्यॅह्यॅह्यॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
अर्रे यही
In reply to >>साखरपुडा by शितल
एफ्डी
In reply to ह्यॅह्यॅह्यॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
इंटरनेट बिल...
In reply to एफ्डी by भाग्यश्री
हाहाहा..
In reply to ह्यॅह्यॅह्यॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
लेख झक्कासच आहे
झकास
छान जमलयं
पुजेचा प्रसाद!
In reply to छान जमलयं by स्वाती२
धन्यवाद...!
ते खरं नव्हे!!
In reply to धन्यवाद...! by सौरव जोशी
सौरव, छान
खरा
सुंदर लेख!
चांगली
भारी
मस्त रे सौरव!
मजा आली
वाह!
सेकंड इनिंग
सौरव, लेख
888 वाचने
छान!
छान!!!!
सही रे जोश्या !!
मस्तच