लज्जत सुखाची
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
लेवून तवंग सुखाचा
आयुष्य बनतं गुळचट
न अडचणींचे डोंगर आडवे
न आशांचे किल्ले रासवट
ऐश्वर्याच्या सरळसोट, उंचच उंच भिंती
न कुठे अश्रूंचा कोनाडा, न कुठे दु:खाची पणती
प्रकाशाची दारं उघडी सताड
रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड
असतं आयुष्य असं
बेचव आणि अळणी
जरी पाऊस सुखाचा,
तोंडात मिठाची गुळणी
सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची
हिंग थोडा चिंतेचा अन् मोहरी हवी कष्टांची
तडतडलेली मोहरी आणते आगळीच खुमारी
सुखाची अशा मग लज्जतच न्यारी.
जयश्री अंबासकर
वाचने
4233
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
दुःखाची मागणी करणारी कुंती आठवली..
--अवलिया
सुखात सुद्धा कोणी दु:ख शोधु शकतं याची कल्पना न केलेलीच बरी..
दु:ख हे आहे कि काहीच दु:ख नाहिये वाह वाह..
बाकी तुम्ही कविता मांडलीत छान..
मराठमोळा.
वेगळी पण छान कविता!
चकली
http://chakali.blogspot.com
तुझ्या कडून जरा वेगळी कविता. मस्त आहे. छान मांडली आहे.
बिपिन कार्यकर्ते
In reply to जरा वेगळी... by बिपिन कार्यकर्ते
तुझ्या कडून जरा वेगळी कविता. मस्त आहे. छान मांडली आहे.
हेच बोल्तो..!
आपला,
(जयूचा फ्यॅन) तात्या.
जयवीताई,
खमंग फोडणी दिलेली कविता आवडली..
खुप अर्थपुर्ण कविता. :)
अंधाराशिवाय प्रकाशाला अर्थ नाही.. तसंच दु:खाशिवाय सुखाची लज्जत कशी समजणार?
शब्दबद्ध छान केलं आहेस हे जयुताई..
मस्त!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रकाशाची दारं उघडी सताड
रात्रीचा अंधारही कुंपणाच्या पल्याड
असतं आयुष्य असं
बेचव आणि अळणी ... अगदी खरं आहे .
कविता आवडली!
-अनामिक
मस्तच! सुखाला हवी खरी फोडणी खमंग दु:खाची! भन्नाट कल्पना आहे. कविता खरच छान आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
(कल्पक)बेसनलाडू
हिंग,मोहरी,खमंग,खुमारी असे खूप छान शब्द कवितेत अनुभवायला मिळाले...
खूप छान...
अवांतर : मात्र सर्वांनाच आयुष्यात अशी दु:खाची फोडणी कमी येवो, असे चिंतिते...
कविता छान आहे...
सुखाला हवी खरी, फोडणी खमंग दु:खाची
हिंग थोडा चिंतेचा अन् मोहरी हवी कष्टांची
मस्तच!!!
अवांतरः कविता बहुतेक स्वयंपाक करताकरता लिहिलेली दिसते....:)
In reply to मस्त कविता.. by स्वाती राजेश
>कविता बहुतेक स्वयंपाक करताकरता लिहिलेली दिसते
:-)
कविमन असलं की जगातील दु:ख पाहून कळतच(कळवळतच) की मग स्व:तासाठी वेगळं मागायची हौस कसली? नाही पटत. :-)
सुंदर शब्द योजना आणि आशयपूर्ण कविता...
अजून लिहा.
जयवी छान कविता. मा.बो. वर प्रतिक्रिया दिली आहे.
मित्रांनो....... मनापासून धन्यवाद :)
स्वयंपाक करता करता कविता सुचली असं म्हणायला हरकत नाही ........कारण नवरा म्हणतो कवितांपेक्षा सैपाक घरातला वावर वाढवा.... त्यामुळे असं झालं असावं ;)
जयवीताई, कविता आवडली आणि इथेही दाद देत आहे.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
आवडली कविता...!
सुरेख कविता. आवडली !!
नेहेमी वृत्तबद्ध राजरस्त्याने जाणार्यांनी कधी थोडे मुक्तकाच्या पायवाटेने जाणेही मनोरंजक असते! :)
चतुरंग
In reply to वेगळी कविता, आवडली! by चतुरंग
वृत्तबद्ध राजरस्ता...... चतुरंगा....... प्रतिक्रिया राजवर्खी आहे हो :) मनापासून आभार :)
दुःखाची