Skip to main content

कृष्णमयी..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 19/03/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी खेळतो मुरारी, पाठशीव.. हसत खेळत, अल्लड गोपिका अव्खळ राधिका, कान्हा पाही.. घट डोईवर, चाले भराभर नदी तीरावर, पाण्यासाठी.. भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग निरखे श्रीरंग, राधिकेला.. चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. पावरीचा सूर, आज दूर दूर प्रणयाचा पूर, गोकुळात.. - प्राजु वि. सु. = अव्खळ , अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.
Taxonomy upgrade extras

ताज महाल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 19/03/2009 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
ताज महाल ताज महाल बांधल्या नंतर परत तशी कलाक्रुति तयार करु नये म्हणुन सर्व कलाकारांचे हात तोडण्यात आले होते..हा ताज महाल चा रक्त रंजित ईतिहास आहे...अशि जि अख्यायिका आहे ति खरी आहे का???? कोणी यावर प्रकाश टाकु शकेल का???????

दोन संघटना

लेखक अजय भागवत यांनी गुरुवार, 19/03/2009 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१३ जानेवारी१८८८ रोजी ३३ संशोधक आणि शोधक (एक्सप्लोरर) कॉसमॉस क्लब, वॉशिंग्टन येथे जमले व त्यांनी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना केली. ह्या मंडळींना कळून चुकले होते की, जगात अजुन खूप काही शोधून काढायचे बाकी आहे व मानवाला पृथ्वीबद्दलची एकंदरीतच माहिती खूपच त्रोटक आहे. केवळ स्थानिकांकडे असलेली माहिती व आत्तापर्यंत जेथे मानव जाउच शकला नाही तेथे जाउन नवी माहिती जगासमोर आणणे अशा दोन्ही बाबी महत्वाच्या मानुन ह्या सोसायटीची गुढी उभारली गेली. ह्या सोसायटीचे उद्दीष्ट्य "भौगोलिय माहितीचा विस्तार व प्रसारण" असे ठरले. सोसायटीची घटना तयार करुन गार्डीनर हबर्ड हे पहिले अध्यक्ष झाले.

गाण्याचा भावार्थ सागा

लेखक राजा यांनी गुरुवार, 19/03/2009 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
घन ओथंबून येती, बनांत राघू ओगिरती पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

होळी विशेष वृत्तांत ..

लेखक बामनाचं पोर यांनी गुरुवार, 19/03/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
होळीच्या निमित्ताने आमचा विशेष वृत्तांत... सर्व वाचकांना होळीच्या मनापासुन शुभेच्छा !! १) चांद्रयानला अभुतपुर्व प्रतिसादामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशापूढील सर्व प्रमुख प्रश्न आता जवळपास सुटल्यात जमा आहेत. चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो पाहुन कृतकृत्य झालेल्या काही बांधकाम व्यवसायीकांनी स्वता:हुन मुंबईतल्या सर्व रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत. चांद्रयानने पाठवलेल्या चित्रफीत भारतात खेड्या-पाड्यात सामुदायीकपणे दाखवल्या गेल्या. यावेळी गावकरयांनी अभुतपुर्व एकी दाखवुन आपसातले सर्व तंटे मिटवले ( चंद्राच्या साक्षिने) . " तंटमुक्त गाव" योजना एका रात्रीत पुर्णत्वास गेली आहे.

वर्तमानपत्रे आणि त्यान्चा दर्जा

लेखक चिरोटा यांनी गुरुवार, 19/03/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वि(म्हणजे १९९५ पर्यन्त वगैरे) बहुतान्शी व्रुत्तपत्रे (मराठी/इन्ग्रजी/इतर) चान्गल्या दर्जाची असायची.व्रुत्तपत्रान्ची वैचारिक बान्धिलकी जरी कुठलिही असली पत्रकारान्चे लेखन नि:स्प्रुह व भावना न भडकावणारे असे.मराठीत गोविन्द तळवल़कर्/माधव गडकरी वगैरे सम्पादकान्चे सम्पादकिय विद्वत्तापुर्ण असे.सम्पादकिय भुमिकेविषयी वाद होवु शकतील पण पूर्ण अभ्यासाअन्तीच त्यान्चे लेख असत.

लहानपण

लेखक जागु यांनी गुरुवार, 19/03/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडे दिवस लहान व्हावे बाल लिलांचे दार उघडावे. बाल कल्पनांत जगावे चॉकलेट च्या बंगल्यात रहावे. परीच्या देशात आभाळी उडावे गोळा, आईस्क्रिमने तोंड माखवावे. माती, चिखलात लोळावे पाण्यात जाऊन डुंबावे. भातुकली, खेळ खेळावे आयते खाउन गाढ झोपावे. जिभ काढुन दुसर्‍यास चिडवावे मार खायचा चुकवावे शुभंकरोती रोज म्हणावे जोरजोरात ओरडावे खुप हसावे खुप रुसावे हट्टालाही पेटून उठावे थोडे दिवस निरागस, निष्पाप व्हावे जबाबदार्‍यांना थोडे टाळावे.
Taxonomy upgrade extras

मन

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी गुरुवार, 19/03/2009 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
मन..... मन आभाळ आभाळ... मन पाऊस पाऊस.. मन आभास आभास... मन सुवास सुवास... मन चांदवा चांदवा.... नभी चांदण्याचा थवा मन पाखरु पाखरु.... मन पारवा पारवा.... मन वेल्हाळ वेल्हाळ... मन कल्लोळ कल्लोळ मन तुफ़ान उधाण... मन पान सळ्सळ..... मन अथांग सागर... मन निळे निळे पाणी... मन आठ्वांचे मोती... मन विरहाची गाणी..... मन हवंस हवंस.... मन नकोसं नकोसं.... मन चांदणी पुनव... विना चंद्राची आवस...... मन कधी ऐलतीर... मन कधी पैलतीर...... मन होउन नावाडी.... तुला भेटण्या अधीर.... मन काहुर-प्रतिक्षा... मन कासाविस आशा.... वाट पाहून पाहून.....