लोकशाही २००९
लोकसंख्येने जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतात आज १४ व्या लोकसभेचे सूप वाजले आणि १५ व्या लोकसभेच्या आगमनाची तुतारी.
काँग्रेससह संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार येणार हा केवळ औपचारीकतेने होण्याचा विधी उरला आहे. सर्वप्रथम त्यानिमित्त काँग्रेस आणि सपुआचे अभिनंदन. वृत्तपत्रातील बातम्यांचा विचार केला तर, या वेळेस उत्तरप्रदेशात वेगळी चूल मांडून एका अर्थी धोका पत्करत, विशेष करून त्या निर्णयास काँग्रेसमधील ढुढ्ढाचार्यांचा विरोध असूनही यश मिळवून दाखवल्याबद्दल राहूल गांधींचे पण अभिनंदन.
मिसळपाव
