Skip to main content

"अबीर" बद्दल काही....

लेखक असिम यांनी सोमवार, 23/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
"अबीर गुलाल उधळीत रंग... नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग" "अबीर" या शब्दाचा नेमका अर्थ काय? व्युत्पत्ती बद्दल कुणी माहिती पुरवू शकेल का? -असिम

वाचने 17239
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

अबीर म्हणजे जसे कुंकु गुलाल तसच एक पांढर्‍या रंगाची पावडर असते.....पुजे मधे त्याचा वापर होतो. अबीर गुलाल उधळले जातात.

In reply to by नरेश_

गैरसमज दुर केल्या बद्दल धन्यवाद. बुक्का काळा असतो हे नक्की माहित होत. गूगल वर अशिहि माहिति मिळालि कि अबिर हि नैसर्गिक रंगची पावडर आहे आणि त्यात फुलांपासुन काढलेले रंग मिसळुन होळी साठी रंग बनवले जातात ... म्हणुन आपला मला वाटल कि अबीर पांढरा असावे. असीम माझा प्रतिसाद काढुन टाकत आहे.

In reply to by सायली पानसे

सायली ताई तुम्ही अबीराच्या फोटोची निगेटिव्ह पाहीलेली दिसत्ये.

अगदी बरोबर नरेश. अबिर हे काळ्या रंगाचे असते.

अबिर हे काळ्या रंगाचे असते. बुक्का म्हणजे काय? अबीर्-बुक्का असा शब्द प्रयोग ऐकला आहे. बुक्का पण काळा असतो. का अबीर म्हणजेच बुक्का? कवटी http://www.misalpav.com/user/765

बुक्का पण काळा असतो. का अबीर म्हणजेच बुक्का >> हो.

अबीर किंवा बुक्का हा वारकर्‍याच्या भाळी नेहमीच लावलेला असतो कारण बुक्का हे पांडुरंगाच्या चरणधुळीचे प्रतिक आहे. --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

तुमच्या प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद! -असिम