Skip to main content

(यादी गेली कवित्व उरले)

लेखक कपिल काळे यांनी बुधवार, 06/05/2009 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
किती भली मोठी लांब किती भली मोठी लांब मारुतीचीच शेपटी देवा!! आता तरी थांब लेखकांना केले सिद्ध तयां केले यादीबद्ध जे वाचले ते टाकले बाकी सारे निषिद्ध स्वाक्षरीत कंपू नसे तोचि मात्र हवा असे प्रतिसादांसाठी कसे मन वेडे हो तरसे कंपूतील गंपू तेच टाकतात नवे पेच कडमडे कोणी नवा धडपडे लागे ठेच ठाके नवा कोणी उभा मांडला सवतासुभा आयडी होइल ब्लॉक नसे पोचण्याची मुभा साहित्याच्या समुद्रात मिपा असे नदीमात्र कशाला ही यादीबिदी स्वांतसुख क्षणमात्र मराठी ही कर्कवृत्ती बरी का हो अशी वृत्ती सत्वरी वाचा , होइल मुद्रण सुलभ आवृत्ती ह. घ्या सा. न. ल.
Taxonomy upgrade extras

प्रकाशचित्र संपादन प्रणाली

लेखक गणा मास्तर यांनी बुधवार, 06/05/2009 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी प्रकाशचित्र संपादनासाठी विंडोज विस्टावर किंवा उबंटुवर वापरता येणारी मोफत संगणक प्रणाली शोधत आहे. पिकासामध्ये बर्‍याच संपादनसुविधांचा अभाव जाणवतो आणि फोटोशॉप विकत घेणे मला परवड्णारे नाही. जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

(प्रश्न)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 06/05/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा एक लेख असा की, थकुन जाते विश्‍व एक काथ्याकुट असा की, कुरतडे उंदीर शर्ट एक प्रवास वर्णन असे की, काळ्या पाण्याची नवी शिक्षा एक कौल असा की, जंत कावीळ एन्फ्लुएंझा एक छंद असा की, जणू आटावे रक्त एक कवीता अशी की, अश्रूच वाही फक्त एक संपादकीय असा की, तो विभागच बंद व्हावा एक पाकृ अशी की, 'परा'चा कावळा व्हावा.
Taxonomy upgrade extras

प्रश्‍न

लेखक ठकू यांनी बुधवार, 06/05/2009 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रश्‍न असा की, बदलून जाते विश्‍व एक प्रश्‍न असा की, भंगते सुंदर स्वप्न एक प्रश्‍न असा की, उमलते नवी अपेक्षा एक प्रश्‍न असा की, अनंत काळची प्रतीक्षा एक प्रश्‍न असा की, जणू फुलावा प्राजक्त एक प्रश्‍न असा की, अश्रूही बनावे रक्त एक प्रश्‍न असा की, तो प्रश्‍नच न राहावा एक प्रश्‍न असा की, उत्तरच प्रश्‍न व्हावा मोगरा फुलला
Taxonomy upgrade extras

काळा मसाला / गोडा मसाला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 06/05/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
जगात भारतीय मसाल्यांना मानाचे स्थान आहे. आता दिवस उन्हाळ्याचे आहेत. आताच्या दिवसात घरोघरी कुरडया, पापड, लोणची तसेच मसाला आणि तिखट केले जाते. त्यातही मसाला करणे म्हणजे एक प्रोजेक्ट असतो. कोणाचा मसाला कसा आहे यावर त्या त्या घरात ग्रुहीणींत संवाद होत असतो. प्रत्येक घराची मसाला करायची पद्धत वेगवेगळी असते. कोणी कोणते प्रमाण वापरतो त्या बद्दल वेगवेगळी मते असतात. तर अशा या वार्षीक पदार्थाचे १ किलो चे प्रमाण आपण सांगावे. लक्षात घ्या की आपण १ किलो मिरची वापरत आहोत. त्या १ किलो मिरचीचा आपण मसाला बनवत आहोत.

दैनंदीनी

लेखक जागु यांनी बुधवार, 06/05/2009 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्य उगवायच्या आधिच हाक मारतो गजर लगबगिने उठावे लागते चोळत-चोळत नजर भांड्यांच्या खणखणाटाने उठते स्वयंपाक घर कोंडलेला श्वास सोडतो गॅसचा सिलेंडर उठा-उठा वेळ होईल ओरडा खातात मिस्टर एकीकडे नाश्ता- डबा सारे काही भरभर नवरोबाच्या तयारीसही, हाकेमध्ये हजर डबा नाश्ता निघताना आहोंसाठी टेबलवर घाईतही निरोप देण्यास स्मितहास्य गालावर पाय घरात वळताच स्वयंपाकघराची आवरा-आवर अभ्यंग स्नान आटोपुन नहाणीघरातिल शॉवर आमची कधी वेळ?
Taxonomy upgrade extras

काठावरचे प्रेम.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 06/05/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
काठावरचे प्रेम..... अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून एकदा रात्र म्हणाली, "बराच काही काळ तळपतोस मग शेवटी असा का मावळतोस?" सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी ! आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !" रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी ! मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय 'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !" सूर्य म्हणाला , "मलाही सख
Taxonomy upgrade extras